Pune News : चांदणी चौक उड्डाणपुलाचे १ मे रोजी उद्धाटन होणार? वाहतूक कोंडी सुटणार असल्याचा दावा !

Pune Chandani Chowk News : मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री हजर राहणार.. 90 टक्के काम पूर्ण..
Pune News :  Pune Chandani Chowk News :
Pune News : Pune Chandani Chowk News : Sarkarnama

Pune News : पुणे शहरातील बहुचर्चित चांदणी चौकातील प्रकल्पाच्या कामांना अधिक गती प्राप्त झाली आहे. या प्रकल्पाचं जवळपास ९० टक्के काम पूर्ण झाल्याचं सांगण्यात येत आहे. या पुलाचे आता निरीक्षण करून येत्या महाराष्ट्र दिनी उद्घाटन होणार असल्याची, घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी यापूर्वीच केली आहे. गडकरींच्या घोषणेनंतर या कामाला विशेष वेग आले होते. या पुलाची पुणेकर अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत आहेत. आता १ मे रोजी या पुलाचे उद्घाटन होणार हे स्पष्ट झाले आहे.

Pune News :  Pune Chandani Chowk News :
Bhavana Gawali Meet Amit Shah : प्रियांका चतुर्वेदीपाठोपाठ भावना गवळीही अमित शहांना भेटल्या अन्‌ म्हणाल्या, रोशनीला मारहाण झालीच नाही...

गडकरींनी उद्घाटनाच्या मुहूर्ताची घोषणा केली आणि यांनंतप या प्रकल्पाचे कामे वेगाने करा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून देण्यात आले. या प्रकल्पात गर्डर टाकण्याचे काम 15 ते 20 एप्रिल पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजित आहे. मात्र हा प्रकल्पाचं लोकार्पण होण्यापूर्वी या मार्गावरील वाहतूक दुसरीकडून वळवण्यात येणार असल्याचे समजते. मुळशी मार्गाकडे जाणाऱ्या भुयारी मार्गाचं कामदेखील युद्धपातळीवर सुरू आहे.

Pune News :  Pune Chandani Chowk News :
Chhatrapati Sambhajinagar Market Committee News : माजी सभापतीच्या आक्षेपानंतर प्रशासकाचा अर्ज फेटाळला..

चांदणी चौकातील कोंडी फुटणार?

जुना उड्डाणपूल जमीनदोस्त केल्यानंतर आणि या प्रकल्पाचं काम सुरू झाल्यापासून, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या होत आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर चांदणी चौकातली वाहतूक कोंडीची समस्या सुटणार असल्याचे, सांगण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्र दिनी या प्रकल्पाचं लोकार्पण झाल्यानंतर वाहतुकीच्या कोंडीत काही फरक पडतो का? हे पाहणे, महत्वपूर्ण आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com