Kundmala Bridge Collapsed Update: बाप-लेकाला मृत्यूनं गाठलं! फादर्स डेचं सेलिब्रेशन करण्यासाठी गेले होते कुंडमळावर ...

Pune’s Mawal kills 4 tourists on Father’s Day: फादर्स डेचं सेलिब्रेशन करण्यासाठी दोघेही बाप लेक कुंडमळावर गेले होते. मात्र, त्यांच्यावर काळाने त्यांच्यावर घाला घातला. या अपघातात चंद्रकांत साठले यांचाही मृत्यू झाला.
Kundmala Bridge Collapses
Kundmala Bridge Collapses sarkarnama
Published on
Updated on

Pune News: पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्यामुळे चार जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मावळ तालुक्यातील कुंडमाळ येथे रविवारी ही घटना घडली. या अपघातात एका बाप लेकाचाही मृत्यू झाला आहे. 'फादर्स डे'लाच बाप-लेकाला मृत्यूने गाठलं, या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

यादुर्घटनेत रोहित माने आणि त्यांचा मुलगा विहान माने या दोघांचा मृत्यू झाला आहे. फादर्स डेचं सेलिब्रेशन करण्यासाठी दोघेही बाप लेक कुंडमळावर गेले होते. मात्र, त्यांच्यावर काळाने त्यांच्यावर घाला घातला. चंद्रकांत साठले यांचाही अपघातात मृत्यू झाला. तर, चौथ्या मृतदेहाची ओळख अजून पटलेली नाही.

काल (१६ जून) पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा परिसर पर्यटकांनी फुलला होता. फादर्स डे आणि रविवारची सुट्टी असल्याने या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होती.

येथे इंद्रायणी नदीवर असलेला जुना लोखंडी पूल कोसळला. त्यावेळी पुलावर ५० हून अधिक पर्यटक होते. माने बाप-लेक हेही फादर्स डे सेलिब्रेशन करण्यासाठी पुलावर गेले होते. काही क्षणातच पुलाचा मधला भाग कोसळला आणि पुलावरील सर्व पर्यटक थेट नदीत कोसळले. यात चौघांचा मृत्यू झाला.

Kundmala Bridge Collapses
Maharashtra Politics: नाकापेक्षा मोती जड होऊ नये म्हणून...

राज्य सरकारने दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पूल नादुरुस्त होता. प्रशासनाच्या वतीने येथे पुलाचा वापर करू नये म्हणून फलक देखील लावले होते. मात्र, पर्यटकांनी त्याकडे दुर्लक्ष केले, असे मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले.

रविवारची ही घटना ताजी असतानाच गोदावरी नदी पात्रात पाच जणांचा मृत्यू झाल्याचेही समोर आले आहे. दर्शनाआधी गोदावरी नदीपात्रात अंघोळीसाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तरुण हैदराबादच्या चिंतल भागात राहणारे आणि मूळचे राजस्थानचे रहिवासी होते.

Kundmala Bridge Collapses
Maharashtra Politics: महाराष्‍ट्रधर्म जागवणाऱ्या बंधूंनी परस्परांना धाडले लखोटे!

नांदेड जिल्ह्यालगत असलेल्या तेलंगणातील श्री सरस्वती देवी मंदिर, बासर येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. हैदराबादमधील चिंतल बाजार येथील एकाच कुटुंबातील १८ जण दर्शनासाठी आले होते. दर्शनाआधी गोदावरी नदीत स्नानासाठी उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने त्यातील ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तेलंगाणा येथील निर्मल जिल्ह्यातील ही घटना समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com