Pune News : कामगार दिनाला मारली दांडी : तब्बल २ हजार तीनशे कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार !

Pune PMC News : १ मे ला सुट्टी समजून दोन हजारांपेक्षा जास्त कर्मचारी गैरहजर...
Pune PMC News
Pune PMC NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे महानगरपालिकेच्या तब्बल २ हजार ३०० कर्मचाऱ्यांवर एकत्रितपणे कारवाईचा बडगा उचलण्यात येणार आहे. असे आदेशच महापालिकेच्या आयुक्तांनी काढले आहे. १ मे रोजी राज्यात सर्वत्र महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा झाला. मात्र पुणे महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हा दिवस सुट्टीचा समजून कामावर गैरहजर राहिले.

Pune PMC News
Satara News : शिंदेंची शिवसेना आमदाराचा गौप्यस्फोट; ४० आमदारांसह वजीर गायब होणार...

याचा परिणाम असा झाला की, पुणे महानगर पालिकेच्या आयुक्तांनी पालिकेच्या तब्बल २ हजार ३०० कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे आता पालिकेच्या कामगार वर्गामध्ये एकच खळबळ माजली आहे. १ मे रोजीच्या महापालिका वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात केवळ दोनशे कर्मचारी उपस्थित राहिले होते. यामुळे आता प्रशासनाकडून संताप व्यक्त केला जात आहे. यामुळे आता आयुक्तांनी तडकाफडकी कर्मचाऱ्यांवर कारवाईचे करण्याचे आदेश दिले आहेत.

Pune PMC News
A highly educated leader in Maharashtra politics : महाराष्ट्राच्या राजकारणातील उच्चशिक्षित नेते

जबाबदारीच्या दिवशी सुट्टी घेणे, आपल्या कर्तव्यात कसूर करणे असा ठपका कर्मचाऱ्यांवर ठेवण्यात य़ेणार असल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्र व कामगार दिनी पुणे महानगरपालिकेच्या २ हजार ३०० कर्मचाऱ्यांनी थेट दांडी मारली. यामुळे नियमानुसार त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com