Sassoon Hospital News : वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचे ससूनकडे दुर्लक्ष? आरोग्य यंत्रणा कोलमडली

Pune News Sassoon Hospital : ससून रुग्णालयातील MRI मशीन गेल्या वीस दिवसांपासून बंद असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून ससून रुग्णालयाकडे दुर्लक्ष होते का? असा प्रश्न विचारला जात आहे.
Sassoon Hospital, Hasan Mushrif
Sassoon Hospital, Hasan MushrifSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 29 August : मागील काही दिवसांपासून ससून रुग्णालय सातत्याने चर्चेत आहे. ससून रुग्णालय परिसरात 1 ऑक्टोबर 2023 मध्ये कारवाई करून सुमारे 2 कोटी 15 लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त केले होते.

त्यानंतर पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलणे, बेवारस रुग्णांना वाऱ्यावर सोडून देणे, रुग्णालयाशी संबंधित अशा अनेक घटना काही दिवसांपासून समोर येत आहेत.

अशातच आता ससून रुग्णालयातील एमआरआय (MRI) मशीन गेल्या वीस दिवसांपासून बंद असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्याकडून ससून रुग्णालयाकडे दुर्लक्ष होते का? असा प्रश्न विचारला जात आहे.

एकीकडे, एक्स-रे, सिटी स्कॅनसाठी रुग्णांना चार दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे. तर दुसरीकडे, एमआरआय मशीन 20 दिवसांपासून बंद असल्याने रुग्णांना परत जावे लागत आहे. ससून रुग्णालयाच्या मुख्य इमारतीच्या ग्राउंड फ्लोअरवर एमआरआय सेंटर आहे. तिथे पुणे (Pune) जिल्ह्यातून हजारो नागरिक उपचारासाठी येत असतात.

मात्र, या ठिकाणी फक्त एकच एमआरआय मशीन उपलब्ध आहे. अशातच आता तांत्रिक अडचणीमुळे ती देखील बंद पडली आहे. त्यामुळे एमआरआय संदर्भातील सर्व तपासण्या सध्या बंद असून लांबून उपचारासाठी आलेल्या नागरिकांवर उपचाराविनाच परत फिरण्याची वेळ आली आहे.

दरम्यान, या प्रकरणी ससून अधीक्षक यलप्पा जाधव यांनी चुप्पी साधली आहे. तर ससूनचे डीन एकनाथ पवार सुट्टीवर आहेत. या सर्व अव्यवस्थेबाबत एकनाथ पवार यांनी यलप्पा जाधव यांच्याकडे बोट दाखवलं आहे.

ससून बाबतचे हे भोंगळ कारभाराचे कारनामे सातत्याने समोर येत असताना देखील वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ मात्र या सर्व गोष्टींवर सातत्याने चुप्पी साधून आहेत. त्यामुळे या सर्व ससून मधील होणाऱ्या गोष्टींना त्यांची मूकसंमती आहे का? असा सवाल सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जातोय.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com