Pune News : सभागृह नेत्यांनंतर मनपाच्या '५३ कोटींच्या' टेंडरसाठी आमदाराची फिल्डींग!

Pune News : प्रशासकराज असतानाही आमदाराच्या विरोधी पक्षातील दोन माजी नगरसेवकांच्या मदतीने टेंडरवर दबाव.
Pune PMC
Pune PMCSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे महापालिकेत सद्या प्रशासकराज आहे. यामुळे सर्व निर्णय प्रशासकीय पातळीवर घेतले जात आहेत. मात्र महापालिकेतील पथ विभागातील तब्बल ५३ कोटी रूपयांच्या टेंडरसाठी दोन पालिकेच्या माजी सभागृहनेत्यांमध्येच चढाओढ लागलेली असताना, यामध्ये आता एका आमदारानेही 'विशेष लक्ष' घातले आहे. यातली ठळक बाब म्हणजे या आमदाराच्या विरोधी पक्षातील दोन माजी नगरसेवकांच्या मदतीने या टेंडरवर दबाव आणण्यास सुरवात केली आहे. यामुळे शहरातील रस्ते दुरुस्तीचा विचार बाजूला राहून कोट्यावधी रुपयांच्या 'डील'साठी राजकीय कुरघोडीची चर्चा महापालिकेत सुरु आहे.

Pune PMC
Pune : माधुरी मिसाळ यांची लक्षवेधी अन् फडणवीसांची मोठी घोषणा; झोपडपट्टी विकासाला मिळणार...

शहरातील रस्त्यांच्या कामासाठी प्रशासनानकडून सुमारे पाचशे कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. एकूण दोन टप्प्यामध्ये साडे तीनशे कोटी रुपयांचे निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहेन मात्र आता या निविदांच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर घोळ होत असल्याचा प्रकार दिसून येत आहे. रस्ते दुरुस्तीच्या कामांसाठी दुसऱ्या टप्प्यात तीन निविदा काढण्यात येणार आहे. जवळपास १४२ कोटी रुपयाची कामे या माध्यमातून केले जाणार आहेत. यातील दोन निविदा प्रत्येकी ५३ कोटी रुपयांचे आहेत. तर तिसरी निविदा ३६ कोटी रूपयांची आहे. दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या व एकूण पॅकेजमधील चौथ्या क्रमांकाच्या ५३ कोटीच्या निविदेसाठी चार दोन ठेकेदारांनी प्रस्ताव ठेवले होते.

निविदा भरण्याची मुदत १९ डिसेंबर रोजी संपणार होती, मात्र आमदाराच्या दबावाखाली ही मुदत दोन दिवसांनी वाढविण्यात आली. या मुदतीमध्ये आणखी दोन ठेकेदारांनी या निविदा भरल्या. आमदार व दोन माजी नगरसेवकांनी चार ठेकेदारांपैकी तिघांना एकत्र करून रिंग करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. उर्वरित एका ठेकेदारास बाद केल्यास आमदारांच्या मर्जीतील ठेकेदारास काम मिळणार आहे. यावरून शुक्रवारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जोरदार वादावादीही झाली, यामध्ये अधिकाऱ्यांचीही चांगलीच कोंडी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Pune PMC
Pune News : प्रशासक राज असतानाही, ५३ कोटींच्या टेंडरसाठी राजकीय वजन वापरणारे सभागृह नेते कोण?

निविदा चारनंतर निवदा पाचसाठी फिल्डींग :

आमदारांनी दोन ठेकेदारांसाठी फिल्डींग लावली आहे. या ५३ कोटीची पहिली निविदा मर्जीतील ठेकेदाराला गेल्यानंतर दुसरी ५३ कोटीची दुसऱ्या ठेकेदारास देण्यासाठी हा खटाटोप सुरू आहे. तर एका माजी सभागृहनेत्याने पाणी पुरवठ्याच्या ६६ कोटीच्या निविदेत प्रचंड राजकीय दबाव आणला होता, आता पथ विभागाच्याही निविदेत हेच चित्र निर्माण झाले आहे, असे सूत्रांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com