Pune News, 16 Nov : "एखाद्या आमदाराने गरिबासाठी रात्र काढली तर त्याचं कौतुक होतं. मात्र हे आमदार श्रीमंताच्या मुलाचे चोचले पुरवण्यासाठी एखाद्या नोकरासारखी रात्रपाळी करत बसले. अशा आमदाराला आता घरी बसवा", असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वडगाशेरीचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांच्यावर निशाणा साधला.
ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार बापूसाहेब पठारे (Bapusaheb Pathare) यांच्या प्रचार सभेत बोलत होते. यावेळी पाटील यांनी बापूसाहेब पठारे यांच्या कामाचं कौतुक करत त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा असं सांगत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील टिंगरे यांनी वडगाव शेरीचे नाव बदनाम केलं आहे.
त्यामुळे अशा आमदाराला घरी बसवा, असं आवाहन पाटील यांनी मतदारांना केलं. या सभेत बोलताना जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, "महाराष्ट्रातील विधानसभा सदस्याकडून काय अपेक्षा असतात? काही वेळापूर्वीच आपण पोर्शे कार अपघातात (Porsche car accident) मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली.
भरधाव वेगातील पोर्शे कार अंगावर घातल्यांने त्या दोघांचा मृत्यू झाला. अशावेळी इथले आमदार जखमी झालेल्या त्या दोघांना रुग्णालयात घेऊन गेले असते आणि ते जिवंत रहावे यासाठी प्रयत्न केले असते, तर कदाचित बापूसाहेब पठारेंना निवडणुकीला उभे राहण्याची संधी मिळाली नसती. मात्र, हे आमदार पोलिस ठाण्यात गेले, अपघातातील आरोपीला पिझ्झा खायला दिला. आख्खी रात्र आरोपी कारचालकासोबत काढली.
एखाद्या आमदाराने गरिबांसाठी रात्र काढली तर त्याचे कौतुक होतं. पण हे आमदार श्रीमंतांच्या मुलाचे चोचले पुरवण्यासाठी एखाद्या नोकरासारखे रात्रपाळी करत बसले. अशा आमदाराला घरी घालवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असं म्हणत त्यांनी सुनील टिंगरेंवर हल्लाबोल केला. तसंच, यावेळी बापुसाहेब पठारेंना शरद पवारांचा (Sharad Pawar) आशीर्वाद आहे त्यामुळे त्यांना निवडून द्या असं आवाहन पाटील यांनी केलं.
ते म्हणाले, "श्रीमंतांची नोकरी करणाऱ्या आमदाराला घरी पाठवा यातच तुमचं हित आहे. मतदारसंघाचा चोवीस तास विचार करणारा आमदार वडगाव शेरीला पाहिजे. बापुसाहेब पठारेंना निवडून दिल्यास ते तुमच्या पाठीमागे उभे राहतील, त्यांना शरद पवारांचा आशीर्वाद आहे."
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.