Ravindra Waikar : रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणाची फाईल बंद!

Big relief for shivsena MP Ravindra Waikar : शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या विरोधातील जोगेश्वरी भूखंड प्रकरणाची फाईल अखेर बंद करण्यात आली आहे. गुन्हे शाखेने दाखल केलेला अहवाल गिरगाव महानगरदंडादाधिकारी न्यायालयाने स्वीकारला आहे.
ravindra waikar
ravindra waikarsarkarnama
Published on
Updated on

Ravindra Waikar : शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या विरोधातील जोगेश्वरी भूखंड प्रकरणाची फाईल अखेर बंद करण्यात आली आहे. गुन्हे शाखेने दाखल केलेला अहवाल गिरगाव महानगरदंडादाधिकारी न्यायालयाने स्वीकारला आहे.

मुंबईतील जोगेश्वरी येथील सुप्रिमो क्लबचा गैरवापर करून तिथे हॉटेल्स बांधताना माहिती लपवल्याचा आणि बनावट माहितीच्या आधारे महापालिकेकडून परवानग्या घेतल्या प्रकरणी त रवींद्र वायकर (Ravindra Waikar) आणि त्यांच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मात्र हा गुन्हा मुंबई महापालिकेने (BMC) गैरसमजातून दाखल केल्याचं सांगत आर्थिक गुन्हे शाखेने हे प्रकरण बंद करण्याचा अहवाल आता न्यायालयात दाखल केला आहे. शिवाय तो अहवाल न्यायालयाने देखील स्वीकारला आहे. त्यामुळे वायकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ravindra waikar
Sharad Pawar: शरद पवारांनी बंडखोरांवर तोफ डागली; म्हणाले, ताकद दिल्यानंतरही ही मंडळी भाजपच्या पंगतीत जाऊन बसली

रवींद्र वायकर हे लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर प्रश्चिम मतदारसंघातून विजयी झाले आहेत. तर वायकरांना ईडीची भीती दाखवून आमच्यापासून फोडल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मागी काही दिवसांपूर्वी केला होता. अशातच आता त्यांच्याविरोधातील भूखंड घोटाळा प्रकरणाची फाईल बंद केल्यानंतर ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com