SSC Maths Paper Leak: धक्कादायक : दहावीचा गणित भाग 1 चा पेपर फुटला ? ; महिला सुरक्षा रक्षकावर..

SSC Exam Paper Leak News: पेपरचे फोटो काढल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
10th math paper leak News
10th math paper leak NewsSarkarnama

Pune News : दहावीची परीक्षेबाबत पुण्यातून मोठी माहिती समोर येत आहे. दहावीचा गणित भाग एकचा पेपर हा एका महिला सुरक्षारक्षकाच्या मोबाईलमध्ये आढळल्याने खळबळ उडाली आहे. हा पेपर फुटल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

मनिषा कांबळे असे या सुरक्षारक्षकाचे नाव आहे.बिबवेवाडी येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयात हा प्रकार घडला.याप्रकरणी या महिला सुरक्षा रक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

13 मार्चला गणित भाग 1 हा पेपर होता. यावेळी सुरक्षा रक्षक मनिषा कांबळेने परीक्षा हॉलमध्ये जाऊन पेपरचे फोटो काढल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

10th math paper leak News
Lok Sabha elections 2024 : लोकसभेसाठी मविआचा फॉर्म्युला ठरला ; ठाकरे गट मुंबईत ६ पैकी..

15 मार्चला (काल) बोर्डाचं पथक तपासणीसाठी विद्यालयात गेलं असता आरोपी महिलेवर पथकाला संशय आला. यानंतर तिच्या मोबाईलची तपासणी करण्यात आली, ज्यामधून गणित भाग एक प्रश्नपत्रिकेचे फोटो तिनं काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

यावेळी पथकाने तातडीने संबधित महिलेकडे चौकशी केली मात्र उडवाउडविची उत्तर देण्यात आली. पथकाकडून बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. किसन भुजबळ यांनी ही तक्रार दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com