PMC Election: सगळं कुटुंब तुरुंगात असलेल्या आंदेकरांना धक्का देण्यासाठी भाजपची मोठी खेळी? ठाकरेंची साथ सोडलेला बडा नेता मैदानात उतरवणार

Bandu Aandekar Family : गेल्या काही निवडणुकांमध्ये प्रभाग क्रमांक 23 या भागातून आंदेकर कुटुंबातील दोन ते तीन नगरसेवक निवडून येत असल्याचं पाहायला मिळत आलं आहे. पूर्वी आंदेकर कुटुंब हे काँग्रेसमध्ये होतं. काँग्रेस असताना आंदेकर कुटुंबातील वत्सला आंदेकर या महापौर देखील राहिल्या आहेत.
Pmc Election Aandekar Family
Pmc Election Aandekar Family Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुण्याच्या महापालिकेच्या प्रत्येक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 23 रविवार पेठ- नाना पेठ हा नेहमी चर्चेचा विषय ठरत असतो. या प्रभागावर गुन्हेगारी जगतात मोठा दबदबा असलेल्या आंदेकर कुटुंबासाठी ओळखला जातो. या प्रभागावर आंदेकर कुटुंबाचा गेली कित्येक दशकं वर्चस्व राहिलं आहे. पण आगामी निवडणुकांच्या तोंडावर पुणे शहरात आंदेकर-कोमकर टोळीयुध्द भडकलं आहे. या टोळीयुद्धातूनच झालेल्या आयुष कोमकर आणि गणेश काळे हत्येप्रकरणी संपूर्ण बंडू आंदेकर कुटुंब तुरुंगात आहे. पण आता याच आंदेकर कुटुंबाचं वर्चस्व मोडून काढण्याची संधी हेरून या प्रभागात भाजप मोठा डाव टाकण्याची शक्यता आहे.

आगामी महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग 23 (रविवार पेठे-नाना पेठ) हा भाग राजकीयदृष्ट्या चर्चेत आहे. येथील पारंपरिक प्रभावी आंदेकर कुटुंबाचे सर्व सदस्य सध्या तुरुंगात असल्याने या प्रभागातील उमेदवारीचा पेच निर्माण झाला आहे.

गेल्या काही निवडणुकांमध्ये प्रभाग क्रमांक 23 या भागातून आंदेकर कुटुंबातील दोन ते तीन नगरसेवक निवडून येत असल्याचं पाहायला मिळत आलं आहे. पूर्वी आंदेकर कुटुंब हे काँग्रेसमध्ये होतं. काँग्रेस असताना आंदेकर कुटुंबातील वत्सला आंदेकर या महापौर देखील राहिल्या आहेत.

2017 आणि 2012 मधील निवडणुकीमध्ये देखील आंदेकर कुटुंबातील सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) निवडणूक रिंगणात उतरले होते. या निवडणुकीतही कुटुंबातील दोन व्यक्ती नगरसेवक म्हणून महापालिकेत पोहोचल्याचं पाहायला मिळालं.

Pmc Election Aandekar Family
Pune land Scam : पार्थ पवारांनी 42 कोटी अजून भरलेलेच नाहीत; जमीन व्यवहारासाठी वापरलेल्या कंपनीवर जप्तीची टांगती तलवार

गेले काही दशक या भागातून आंदेकर कुटुंबातील व्यक्ती निवडून महापालिकेत जाण्याची परंपरा बनली आहे. मात्र, या निवडणुकीत आंदेकर कुटुंबातून निवडणूक रिंगणामध्ये कोणी उतरणार का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण कुटुंबातील बहुतांश सदस्य हे जेलमध्ये आहेत.

आंदेकर कुटुंब हा रविवार पेठ-नाना पेठ भागातील जुना राजकीय वारसा असलेला गट आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांत या कुटुंबावर पोलिसांनी सखोल कारवाई केली. विविध गुन्ह्यांप्रकरणी सर्व प्रमुख सदस्यांना अटक करण्यात आली असून, आता ते सर्वजण गजाआड आहेत. यामुळे प्रभागातील मतदार आणि स्थानिक नेत्यांमध्ये असमंजस आहे. "आंदेकर कुटुंबाच्या अनुपस्थितीत कोण ही निवडणूक लढवणार, याबाबत स्पष्टता नाही.

Pmc Election Aandekar Family
Local Body Elections : निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा झटका; बंटी भांगडियांच्या 'व्होट बँके'ला खिंडार

आता प्रभागातील मतदार आणि स्थानिक नेत्यांमध्ये असमंजस आहे. "आंदेकर कुटुंबाच्या अनुपस्थितीत कोण ही निवडणूक लढवणार, याबाबत अद्यापही स्पष्टता नाही. त्यामुळे या भागातून भाजपला आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याची संधी निर्माण झाली आहे. शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केलेले विशाल धनवडे यांना या प्रभागातून संधी मिळण्याची शक्यता आहे.

याचपोकळीचा फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे. विशाल धनवडे हे प्रभागातील प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्याकडे स्थानिक मुद्द्यांवर मजबूत पकड असल्याने पक्षातर्फे त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. धनवडे यांनी गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर चांगली कामगिरी केली होती, आणि आता भाजपच्या विस्तार धोरणात ते महत्त्वाचे दिसत आहेत.

Pmc Election Aandekar Family
Bhaskar Ambekar Join Shivsena : 'माझी निष्ठा वांझोटी ठरली' उद्धव ठाकरेंचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर शिंदेंच्या शिवसेनेत!

तसेच अनुसूचित जाती आणि सर्वसाधारण गटातून नवीन चेहऱ्यांची चर्चा जोरात आहे. दुसरीकडे, अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गातून सुधीर जानजोत हे प्रमुख नाव आहे. जानजोत हे स्थानिक सामाजिक कार्यकर्ते असून, दलित समाजातील पाठिंब्यामुळे त्यांना संधी मिळू शकते.

सर्वसाधारण गटातून मात्र स्पर्धा तीव्र आहे. वीरेंद्र किराड, संजय मोरे आणि चेतन मोरे हे तिन्ही नावे चर्चेत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख संजय मोरे हे देखील या प्रभागातून निवडणूक रिंगणात उतरू शकतात. त्यासोबतच चेतन मोरे हे देखील या प्रभागातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. आंदेकर कुटुंब तुरुंगात असल्याने या ठिकाणी निर्माण झालेली पोकळीचा फायदा भाजप घेणार का? आणि निवडणुकीत नेमके कोणते मोहरे उतरवणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com