

PMC Election News : उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पुण्यात भाजपमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या. यात वडगाव शेरी मतदारसंघातही नवा ट्विस्ट आला आहे. भाजपने सुरेंद्र पठारे यांना त्यांच्या जुन्याच खराडी-वाघोली या प्रभाग चारमधून उमेदवारी दिली असून विमाननगर-लोहगाव या प्रभाग तीनमधून त्यांच्या पत्नी ऐश्वर्या पठारे यांना मैदानात उतरवले आहे. आयटी क्षेत्राचा प्रभाव असलेल्या या प्रभागातून एका आयटी इंजिनिअरलाच उमेदवारी दिल्याने भाजपचा हा मास्टरस्ट्रोक मानला जात आहे.
विमाननगर-लोहगाव या प्रभागात उच्चशिक्षित आणि आयटी क्षेत्रातील मतदार मोठ्या प्रमाणात आहे. जोडीला या प्रभागात गावकी-भावकीचे राजकारणही आहे. सुरेंद्र पठारे यांची या भागात प्रचंड क्रेझ असली तरी त्यांच्या उमेदवारीमुळे स्थानिक गावकऱ्यांची नाराजी ओढावण्याची शक्यता होती. परिणामी गावकऱ्यांच्या एका घरातील महिलेला संधी द्यावी लागली असती. हे टाळण्यासाठी सुरेंद्र पठारे यांनी त्यांच्या पारंपरिक खराडी-वाघोली या प्रभाग क्रमांकचारमधून लढायचे ठरवले.
ऐश्वर्या पठारे यांच्या उमेदवारीनंतर प्रभाग तीनमधून भाजपचे पॅनल प्रचंड स्ट्राँग झाल्याचे बोलले जात आहे. ऐश्वर्या या स्वत: 'एमआयटी'मधून इंजिनिअर असून त्यांनी भारतासह विविध देशात मोठमोठ्या 'आयटी' कंपन्यांमध्यये काम केले आहे. प्रभाग तीनमधील आयटी वर्गात त्यांचा मोठा जनसंपर्क असून स्वत: इंजिनियर व आयटीमध्ये असल्याने त्या येथील सोसायटी वर्गाच्या समस्या व्यवस्थित समजावून घेऊ शकतात. गेली काही वर्षे सुरेंद्र पठारे फाउंडेशनच्या माध्यमातून ऐश्वर्या पठारे या भागात कार्यरत आहेत.
याशिवाय ऐश्वर्या पठारे यांनी सखी महिला मंचच्या माध्यमातून सात हजाराहुन अधिक महिलांचे संघटन उभे केले आहे. त्यांनी यापूर्वी आमदार बापू पठारे व सुरेंद्र पठारे यांच्या निवडणुकीत पडद्यामागून रणनीती तयार करण्याची जबाबदारी पार पडली होती. आता याच ऐश्वर्या पठारे यांच्या रुपाने भाजपने उच्चशिक्षित महिला उमेदवार देऊन तीन आणि चार हे दोन्ही प्रभाग सेफ केल्याचे दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.