
Urban Development Minister's decision on newly added Pune PMC villages : पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या 32 गावांसह महापालिकेच्या हद्दीत आधीपासून निवास करीत असलेल्या सर्व नागरिकांना समान न्याय मिळेल आशा पद्धतीची मिळकत कर आकारणीची रचना करण्यात येणार असल्याचं आश्वासन नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले आहे.
पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी माधुरी मिसाळ यांनी महापालिका प्रशासनाबरोबर गुरुवारी बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मिसाळ म्हणाल्या, "ग्रामपंचायतीपेक्षा खूप जास्त कर समाविष्ट गावातील मिळकतधारांकडून आकारला जात असल्याची भावना या समाविष्ट गावातील नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे समाविष्ट गावातून अपेक्षित महसूल संकलन होत नसून अनेक जण कर भरण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे सर्वांना समान न्याय मिळेल अशी कर रचना करणारा सविस्तर प्रस्ताव पुणे महापालिकेने राज्य शासनाकडे पाठविल्यास त्याला मंजुरी देण्यात येईल." असं माधुरी मिसाळ यांनी सांगितलं.
तसेच, मिसाळ म्हणाल्या, ''पुण्यात दोन वर्ष पूरस्थिती होती त्यानुषंगाने आपत्कालीन व्यवस्था आढावा घेण्यात आला असून केंद्र सरकारकडून आपत्कालीन व्यवस्थेसाठी ८० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. महापालिका अंतर्गत दोन प्रकल्प राबवणार आहे. अमृत योजना अंतर्गत ड्रेनेजची कामे चांगल्या प्रकारे करण्यात होत आहेत. शहरात नवीन सहा एसटीपी प्रकल्प हाती घेण्यात आले असून एकूण दहा एसटीपी करण्यात येणार आहेत.''
याशिवाय, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत साडेचार हजार घरे बांधणे प्रस्तावित आहे. त्यासाठी काही गायराने जागाची पाहणी करण्यात येत आहे. पुण्यात या योजनेअंतर्गत गृहनिर्मितीसाठी जमीन उपलब्ध नसल्याने, नवीन बांधकाम ठिकाणी काही दुसऱ्या अधिक प्रमाणात योजना राबवता येईल का? याबाबत चर्चा सुरू आहे. तसेच, शहरातील कर प्रणाली वसुली बाबत आढावा घेतला असता, अनेक जागी कर थकबाकी अधिक असल्याचे दिसून आले आहे. थकीत कर यावर दंड लागल्याने देखील थकीत कर अधिक आहे.आतापर्यंत साडेनऊशे कोटी रुपये कर वसूल करण्यात आले आहे. अशी माहितीही मिसाळ यांनी दिली.
याचबरोबर मिसाळ म्हणाल्या, "शहरातील पथदिव्यांचा आढावा देखील घेण्यात आला. ५० मेगा वॅट सोलर प्रकल्प प्रस्तावित असून महापालिकेची सार्वजनिक वीज गरज त्यातून भागू शकेल. २०० नवीन इलेक्ट्रिक बस खरेदी बाबत देखील निर्णय घेतला असून त्या लवकर उपलब्ध होतील. नॅशनल ग्रीन एयर प्रोग्राम अंतर्गत ३५० कोटी रुपये मनपाला उपलब्ध झाले आहे. नगरविकास खाते यांना शहरातील सीमाभिंत बांधण्याबाबत २०० कोटी रुपये खर्च प्रस्ताव मनपाने दिला आहे."
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.