Pune News : पीएमआरडीएच्या 'डीपी'ला मुहूर्त लागेना ; 'सीएम' बरोबरची बैठक पुन्हा लांबणीवर...

PMRDA Meeting : पुणे तसेच पिंपरी - चिंचवड शहराच्या पायाभूत सोयी सुविधांवर ताण
PMRDA
PMRDA Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) प्रारुप विकास आराखड्यास (डीपी) मान्यता देण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या बैठकीला मुहूर्त मिळत नाही. या बैठकीमध्ये विघ्न निर्माण झाले असून ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. पीएमआरडीएच्या डीपीला मान्यता देण्यासाठी बुधवार दि. 24 जानेवारी रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार होती. मात्र, आता ऐनवळी ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. ही बैठक पुढे गेल्याने डीपी मान्यतेचा मुहूर्ताची चर्चा आता सुरू झाली आहे. यापूर्वी देखील मुख्यमंत्र्यांबरोबर ठरवण्यात आलेली ही बैठक पुढे गेली होती. पुणे तसेच पिंपरी - चिंचवड शहराचा वाढत असलेल्या विस्तारामुळे पायाभूत सोयी सुविधा यावर ताण वाढत आहे.

PMRDA
Government of Assam : भाजपवर टिका करताना राहुल गांधीच्या निशाण्यावर नागपूर !

नागरिकांना आता कमी करण्यासाठी यापूर्वी कार्यरत असलेल्या नवनगर विकास प्राधिकरण यांनी 2017 मध्ये डिपी जाहीर केला होता. त्यानंतर ऑगस्ट 2021 मध्ये प्रारूप विकास आराखडा तयार करून तो जाहीर करण्यात आला. यावर नागरिकांकडून हरकती सूचना देखील मागविण्यात आल्या. सुमारे 67 हजारापेक्षा अधिक नागरिकांनी यावर हरकती दाखल केल्या होत्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तीन वर्षापूर्वी पुण्यासह संपूर्ण राज्यात कोणाचे प्रमाण वाढल्याने प्राधिकरणाच्या डीपीचे काम थांबले होते. परिणामी राज्य सरकारकडून त्यास मुदतवाढ देण्यात आली होती. हा डीपी मंजूर करून त्याची अंमलबजावणी सुरू करावी, अशी मागणी करण्यात येत होती. दरम्यान, विकास आराखड्यावर नागरिकांकडून दाखल झालेल्या हरकती आणि सूचनांवर सुनावणी घेण्यासाठी राज्य सरकारने डिसेंबर 2019 मध्ये तज्ज्ञ समितीची नेमणूक केली.

दाखल हरकती - सूचनांचे नियोजन करून 2 मार्च 2022 पासून समितीने सुनावणी घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर डिसेंबर 2022 मध्ये म्हणजे दहा महिन्यानंतर या समितीने सुनावणीचे काम संपविले. त्यानंतर जानेवारी महिन्यात आराखड्यावर संस्थात्मक आणि लोकप्रतिनिधींची सुनावणी समितीकडून घेण्यात आकी आहे.

या विकास आराखड्याला मान्यता देण्यासाठी यापूर्वी 5 डिसेंबर 2023 मध्ये मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलवण्यात आली होती. मात्र, ऐनवेळी ही बैठक रद्द करण्यात आली. काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे कारण पुढे करून आखणी एक महिना मुदतवाढ यासाठी राज्य सरकारकडून देण्यात आली.

आता बुधवारी होणारी बैठक पुढे ढकलण्यात आल्याने पीएमआरडीएच्या डीपीस मान्यता देण्यासाठी मुहूर्त कधी मिळणार? अशी विचारणा नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर ठरलेली बैठक पुढे ढकलण्यात आल्याचे पत्र मंगळवारी संध्याकाळी मिळाले असून पुढील बैठक कधी होणार हे मुख्यमंत्री कार्यालयाकडून कळवले जाईल असे पीएमआरडीए मधील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

(Edited by Amol Sutar)

PMRDA
Maharashtra-Madhya Pradesh : महाराष्ट्र-मध्यप्रदेशला जोडणाऱ्या रस्त्यासाठी गडकरींनी दिले ‘हे’ आश्‍वासन !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com