Sharad Mohol : शरद मोहोळ हत्याप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांनी पकडले आठ आरोपी!

Sharad Mohol Death : 3 पिस्तूल, 3 मॅगझीन, 5 राउंड व 2 चारचाकी गाड्या ताब्यात
 Sharad Mohol death
Sharad Mohol deathSarkarnama
Published on
Updated on

Pune Crime News : पुण्यातील कोथरुडमधील सुतारदरा भागात शुक्रवार दुपारी कुख्यात गुंड शरद मोहोळ याला ठार करण्यात आलं. चार अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर भरदिवसा गोळ्या झाडल्याने एकच खळबळ उडाली. हल्ल्यानंतर मोहोळला रुग्णलयात दाखल करण्यात आले होते, मात्र तिथे त्याला मृत घोषित केले गेले. दरम्यान, या घटनेनंतर हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांनी तातडीने यंत्रणा कामाला लावली आणि आठ आरोपींना ताब्यातही घेतलं आहे.

शरद मोहोळ याच्या हत्येच्यासंदर्भाने कोथरूड पोलिस स्टेशन गुन्हा रजि क्र. 2/23 कलम 302, 307, 34 IPCसह भारतीय हत्यार कायदा कलम 3, 25, महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम 37 (1), (3)सह 135 प्रमाणे दाखल गुन्ह्याच्या तपासासाठी पुणे शहर गुन्हे शाखेची 9 तपास पथके पुणे शहराच्या परिसरात आणि पुणे ग्रामीण, सातारा व कोल्हापूरच्या दिशेने रवाना करण्यात आली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

 Sharad Mohol death
Pune Crime News : लग्नाच्या वाढदिवसालाच कुख्यात गुंड शरद मोहोळचा 'गेम'; गोळीबारात मृत्यू

त्यादरम्यान पुणे-सातारा रोडवर किकवी-शिरवळदरम्यान तपासात निष्पन्न झालेल्या संशयित स्विफ्ट गाडीचा पाठलाग करून 8 आरोपी, 3 पिस्तूल, 3 मॅगझीन, 5 राउंड व 2 चारचाकी गाड्या ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत. हा गुन्हा शरद मोहोळ (Sharad Mohal) बरोबर असलेल्या जमिनीच्या, पैशाच्या जुन्या वादातून आरोपींनी केला असल्याचे प्रथमदर्शी तपासात निष्पन्न झाले आहे.

ही कामगिरी पुणे (Pune) शहर गुन्हे शाखेने कारवाई करून घटनास्थळी गोळीबार करणाऱ्या व त्यांना मदत करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे. कोथरूड परिसरात शरद मोहोळवर दुचाकीवरून आलेल्या तीन ते चार जणांनी गोळीबार केला. गोळीबार करून हल्लेखोर फरार झाले होते.

 Sharad Mohol death
Devendra Fadnavis : गृहमंत्री फडणवीसांनी सांगितलं शरद मोहोळचा मारेकरी कोण?

पुण्यातील गँगवाॅर प्रकरणातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. गोळीबाराचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. शरद हिरामण मोहोळ (वय ४०, रा. माऊलीनगर, सुतारदरा, कोथरूड) याच्याविरोधात पुणे शहर, पिंपरी, तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com