टीईटी परीक्षा घोटाळा मंत्रालयापर्यंत : सुपेचा गाॅडफादर IAS अधिकारी अटकेत

TET exam scam पुणे पोलिसांच्या कठोर कारवाईने राजकीय वर्तुळात खळबळ
Sushil Khodvekar
Sushil Khodvekarsarkarnama
Published on
Updated on

पुणे : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) (TET Exam) प्रकरणात मोठा मासा पुणे पोलिसांच्या (Pune Police) गळाला लागला आहे. आतापर्यंत केवळ शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांशी संबंधित चर्चा होती. आता याचे जाळे मंत्रालयात पोहोचले आहेत. ही परीक्षा घेणाऱ्या जी. ए. साॅफ्टवेअर टेक्नोलाॅजीस कंपनीला सढळ हाताने मदत करण्यात मंत्रालयातील अधिकाऱ्यांचा हात आढळला आहे.

या कंपनीला काळ्या यादीतून बाहेर काढण्यास मदत तसेच या प्रकरणात आर्थिक लाभ स्वीकारल्याप्रकरणी शिक्षण खात्यातील आस्थापना विभागाच्या तत्कालीन उपसचिवाला आज सकाळी अटक करण्यात आली. आएएस दर्जाचा अधिकारी प्रथमतःच पुणे पोलिसांना सापडला आहे. सुशील खोडवेकर (वय ४७) असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. या खोडवेकरला कोणी तेथे आणले, याचा शोध घेतल्यानंतर अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.

Sushil Khodvekar
काय सांगता! TET परीक्षेत अपात्र 7800 परीक्षार्थीं पैसे घेऊन पास

टीईटी भरतीत सुमारे साडेआठ हजार जणांना गैरप्रकार करून उत्तीर्ण करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मोठी कारवाई झाली आहे. या प्रकरणात शिक्षण परिषदेचा आयुक्त तुकाराम सुपे, शिक्षण विभागाचा तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर यांना यापूर्वी अटक करण्यात आली आहे.

हा सर्व प्रकार घटला तेव्हा खोडवेकर हे शिक्षण खात्यातील आस्थापना विभागात उपसचिव होते. सध्या त्यांची नियुक्ती कृषी खात्यात आहे. आज सकाळी खोडवेकर यांना अटक करण्यात आली असून त्यांना दुपारी न्यायलयात हजार करण्यात आले आहे.

Sushil Khodvekar
TET Exam Scam : टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात सुपेंच्या ड्रायव्हरलाही अटक

या प्रकरणात सुपे, सावरीकर, जी. ए. साॅफ्टवेअर टेक्नोलाॅजीस कंपनीचा संचालक डाॅ. प्रीतिश देशमुख, माजी संचालक अश्विनीकुमार तसेच शिक्षण परिषदेचे तत्कालीन आयुक्त सुखदेव डेरे यांच्यासह इतर काही शासकीय नोकरदार तसेच एजंट आणि साखळीतील इतरांना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपींकडे केलेल्या चौकशीत खोडवेकर यांचा देखील या गैरव्यवहारात सहभाग असल्याचे समोर आले. तपासात हा प्रकार समोर आल्यानंतर सखोल माहिती घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी जी. ए. साॅफ्टवेअर टेक्नोलाॅजीस कंपनीला काळ्या यादीतून बाहेर काढण्यास मदत केली. सावरीकर याच्याकडून पैसे घेतले. तसेच, अनेक मुलांना पास केल्याचे समोर आले आहे. त्यांनी आयुक्त तुकाराम सुपे यांना सांगून ही मुले पास केली आहेत. सुशील यांनी सावकरीकरकडून पैसे घेतले आणि सुपेंना सांगून मुले पास केली आहेत. यासह खात्यांतर्गत चौकशीत सुपे यांना निर्दोष ठरविण्यात भूमिका बजावली, अशी माहिती समोर आली आहे.

Sushil Khodvekar
टीईटी पेपरफुटी प्रकरणी तुकाराम सुपे अखेर निलंबित

सुशील खोडवेकर याची गुन्ह्यातील भूमिका :

- जी. ए. साॅफ्टवेअर टेक्नोलाॅजीस कंपनीला काळ्या यादीतून बाहेर काढण्यास मदत केली.

- सावरीकर याच्याकडून पैसे घेतले व अनेक मुलांना पास केले

- खात्यांतर्गत चौकशीत सुपे यांना बेकसूर ठरविण्यात भूमिका बजावली

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com