Pune Porsche Car Accident : पुण्यातील कल्याणीनगर येथे अल्पवयीन मुलाने पोर्श कारने दोन तरुणांचा जीव घेतला. या प्रकरणी पोलिसांनी अक्षम्य चुका केल्याचा आरोप होत आहे. अपघात झाल्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या येरवडा पोलिसांनी घटनेबाबत कंट्रोल रुमला माहिती दिली नसल्याचे पुढे आहे आहे. यातून येरवडा पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांना दोघांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. Pune Hit And Run Case
अपघात प्रकरणातील अल्पवीयन मुलाचे वडील विशाल अगरवाल Vishal Agarwal यांच्यावर पुरावे नष्ट केल्याच्या आरोपातून गुन्हा दाखल झाला होता. अटकेनंतर त्यांची तीन दिवसाच्या पोलिस कोठडीची (Police Custody) मुदत शुक्रवारी संपली. त्यानंतर विशाल अगरवाल यांना शनिवारी (ता. 24) कोर्टासमोर हजर केले असता त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, या घटनेतील अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी स्थानिक आमदाराने पोलिसांवर दबाव आणला, तसेच पोलिसांनीही आरोपीस वाचवण्यासाठी प्रयत्न केल्याचे आरोप होत आहेत. यातून पुणेकरांसह काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांनी Ravindra Dhangekar जोरदार हल्लाबोल केला आहे. आता या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकरी अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर तपासात दिरंगाई आणि अपघाताची माहिती वेळेत वरिष्ठांना दिली नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या कारवाईमुळे पुणे पोलिसांत एकच खळबळ उडाली आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.