Nilesh Ghaiwal: गुंड निलेशनंतर आता सचिन घायवळ पुणे पोलिसांच्या रडारवर; मोक्काअंतर्गत कारवाई करणार

Pune Police mcoca on Sachin Ghaiwal:सचिन घायवळ याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची यादीत समोर आल्यानंतर त्याला शस्त्र परवाना कसा देण्यात आला? हा प्रश्न पोलिसांना करण्यात येत आहे.
 Sachin Ghaiwal, Nilesh Ghaiwal, Yogesh Kadam
Sachin Ghaiwal, Nilesh Ghaiwal, Yogesh Kadam sarkarnama
Published on
Updated on

कुख्यात गुंड घायवळ बंधूच्या 'कारवाया'मुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. गुंड निलेशचा सख्खा भाऊ सचिन घायवळ हा सध्या पुणे पोलिसांच्या रडारवर आहे. त्याच्याविरोधात मोक्का लावण्याची प्रक्रिया पुणे पोलिसांनी सुरु केल्याची माहिती आहे. निलेश घायवळ याच्याविरोधात यापूर्वी मोक्का लावण्यात आला होता. निलेश हा फरार असून त्यांचे शेवटचे लोकेशन हे लंडन येथे आढळले असल्याचे पोलिसांनी सांगितले. निलेशच्या विरोधात लुक आऊट नोटीस काढण्यात आली आहे.

सचिन घायवळ याला शस्त्र परवाना कुणाच्या आशीवार्दानं मिळाला, यावरुन सध्या पोलिस आणि राजकारणात 'ती' व्यक्ती कोण आहे,याचा तपास सुरु आहे. संशयांची सुई कुणाकडे जाणार हे लवकरच समजेल. दुसरीकडे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना या प्रकरणावरुन विरोधकांनी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. योगेश कदमांनी कुणाच्या सांगण्यावरुन सचिन घायवळला हा बंदुकीचा परवाना दिला, याबाबतचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सचिन घायवळ याला योगेश कदम यांच्या शिफारसीने शस्त्र परवाना दिल्याची माहिती समोर आल्यानंतर योगेश कदम यांनी स्पष्टीकरण देताना सुनावणीच्या दिवशीपर्यंत त्यांच्या विरोधात कोणतेही गुन्हे प्रलंबित नव्हते, असं म्हणत आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे. पण सचिन घायवळ याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची यादीत समोर आल्यानंतर त्याला शस्त्र परवाना कसा देण्यात आला? हा प्रश्न पोलिसांना करण्यात येत आहे.

 Sachin Ghaiwal, Nilesh Ghaiwal, Yogesh Kadam
Bapu Pathare: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आमदाराच्या विरोधात गुन्हा; अजित पवार समर्थकाच्या तक्रारीवरुन कारवाई

या प्रकरणी एका व्यावसायिकाने कोथरूड पोलिस ठाण्यात सचिन घायवळ याच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हा प्रकार २०२२ ते २०२३ दरम्यान घडल्याचे तक्रारीत नमूद आहे.

कोथरूडमधील एका इमारतीचे बांधकाम तक्रारदार करत होते. त्यावेळी आरोपी नीलेश व त्याच्या साथीदारांनी तेथे येऊन त्यांना धमकावले. नीलेश घायवळच्या परवानगीशिवाय येथे कोणतेही काम होऊ शकत नाही,' असे सांगून त्यांनी बांधकाम थांबवले आणि नंतर सदनिका देण्याची मागणी केली. तक्रारदारांनी त्यावेळी पोलिसांत दाद मागितली नव्हती.

 Sachin Ghaiwal, Nilesh Ghaiwal, Yogesh Kadam
महाराष्ट्रभर फिरा! कधीही, कुठेही अन् कितीही... एकाच पासमध्ये; एसटीच्या लोकप्रिय योजनेत भाडेकपात
  1. सचिन घायवळ यांच्यासह इतर सात जणांविरोधात कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

  2. कोथरूडमध्ये नव्याने बांधलेल्या इमारतीतील १० सदनिका जबरदस्तीने बळकावल्याप्रकरणी कारवाई केली आहे.

  3. इमारतीतील दहा सदनिका जबरदस्तीने ताब्यात घेतले आणि ते इतर व्यक्तींना भाड्याने दिल्याचा आरोप तक्रारीत केला आहे.

  4. भाड्याची रक्कम बापू कदम नावाच्या व्यक्तीद्वारे नीलेशला दिली जात असल्याचेही नमूद केले आहे.

  5. नीलेशविरोधात तक्रारी करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन पोलिसांनी केले होते.

  6. गेल्या १५ दिवसांत नीलेश घायवळविरुद्ध दाखल झालेला हा पाचवा गुन्हा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com