Pune Police|
Pune Police|Sarkarnama

Pune Police : पुणे पोलिसांचा धडाका ; कोम्बिंग ऑपरेशनमध्ये आढळले तब्बल ६६० गुन्हेगार!

Pune News : शहरात मागील काही दिवसांपासून शहरात वाढलेली गुन्हेगारी लक्षात घेता कारवाई!
Published on

पुणे : आंतरराष्ट्रीय जी-२० परिषद आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पुणे शहरात ११ ते १२ जानेवारीदरम्यान कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. गुन्हे शाखा आणि पोलिस ठाण्यांतील पथकांकडून या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये तीन हजार ५८३ संशयित तपासण्यात आले. त्यापैकी ६६० गुन्हेगार आढळून आले आहेत.

शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी तसेच सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे. हॉटेल, लॉजेस, एसटी बस, रेल्वे स्क्षानकांसह सार्वजनिक ठिकाणी आढळणाऱ्या संशयित व्यक्तींची तपासणी करण्यात येत आहे. गुन्हे शाखा आणि पोलिस ठाण्यांकडून विविध पथके स्थापन केली आहेत. त्यात गंभीर गुन्ह्यातील फरारी, तडीपार, मोकाच्या गुन्ह्यातील आरोपी तसेच कोयता गॅंगमधील गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली.

Pune Police|
Pune News : हिंदूराष्ट्र सेनेच्या नऊ जणांना मरेपर्यंत जन्मठेप : ॲड. निकमांचा युक्तिवाद कोर्टाने केला मान्य!

प्रजासत्ताक दिनानिमित्त आणि आंतरराष्ट्रीय जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून पुणे कडक सुरक्षा ठेवण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय जी-२० परिषदेच्यानिमित्ताने अनेक परदेशी पाहुणे, परदेशी पर्यटक येणार आहेत. यामुळे पुणे शहरात मागील काही दिवसांपासून शहरात वाढलेली गुन्हेगारी लक्षात घेता, कसलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सतर्कता बाळगण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com