Maharashtra Police recruitment
Maharashtra Police recruitmentSarkarnama

Pune Police Recruitment: सरकारी नोकरीसाठी तयार राहा! पुणे पोलीस दलात होणार मोठी भरती; लवकरच प्रक्रिया सुरू

Pune Police Recruitment: पोलीस दलामध्ये काम करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारकडून यापूर्वीच राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये १६००० पोलीस कर्मचाऱ्यांची भरती होणार असल्याचं जाहीर केलं होतं.
Published on

Pune Police Recruitment: पोलीस दलामध्ये काम करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारकडून यापूर्वीच राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये १६००० पोलीस कर्मचाऱ्यांची भरती होणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार पुणे पोलीस दलामध्ये लवकरच भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. या भरतीच्या प्रस्तावाला तत्वतः मान्यता देण्यात आली आहे.

Maharashtra Police recruitment
Scindia Family Dispute: सिंधिया कुटुंबाच्या 40 हजार कोटींच्या संपत्ती वादावर अखेर निघणार तोडगा; हायकोर्टाचा सर्वात मोठा आदेश, 90 दिवसांत...

पुणे शहराची भौगोलिक सीमा वाढल्यानं तसंच लोकसंख्या सुमारे 70 लाखांवर पोहोचल्यामुळं शहरातील गुन्हेगारी, वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या समस्यांवर मोठा ताण पडत आहे. शिक्षण, आयटी, ऑटोमोबाईल आणि औद्योगिक केंद्र म्हणून पुण्याची ओळख आहे. इतका मोठा शहराचा पसारा वाढलेला असताना त्यासाठी केवळ 8,500 पोलिस अधिकारी आणि कर्मचारी सध्या कार्यरत आहेत. दरम्यान, वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर विशेषतः गोळीबार, गँगवॉर आणि कोयता गँगच्या दहशतीमुळे पुणे शहर आणि पोलीस बदनाम झाले आहेत. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस भरती महत्वाची ठरणार आहे.

Maharashtra Police recruitment
Nilesh Lanke Vs BJP Sujay Vikhe : काहींची पुरती जिरली तरी..; खासदार लंकेंनी विखेंना डिचवलं

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीद्वारे पुणे पोलीस दलात 1,720 नवीन पदांच्या भरतीला मंजुरी देण्यात आली आहे. मागील काही वर्षांतील सर्वातील ही मोठी भरती ठरणार आहे. पुणे पोलीस आयुक्तालयाने पाच नवीन पोलीस ठाण्यांची मागणी केली होती, ज्याला गृह विभागानं नुकतीच मंजुरी दिली. यामध्ये मांजरी, लोहगाव, येवलेवाडी, नऱ्हे आणि लक्ष्मीनगर या नवीन पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. ही ठाणी अनुक्रमे हडपसर, विमानतळ, कोंढवा, सिंहगड आणि येरवडा पोलीस ठाण्यांपासून विभाजन होऊन तयार होणार आहेत.

Maharashtra Police recruitment
Barshi Crime : बार्शीतील कला केंद्रात पुन्हा क्राईम; ‘आईकडून 20 लाख मागून घे; नाहीतर हातपाय तोडेन’, खंडणीसाठी मॅनेजरचे अपहरण

या भरतीअंतर्गत 830 नवीन पदांची निर्मिती होणार असून, उर्वरित पदे रिक्त जागांमधून भरली जाणार आहेत. याशिवाय, दोन स्वतंत्र परिमंडळांना मान्यता मिळाली असून, त्यात दोन उपायुक्त, चार सहाय्यक आयुक्त, पाच वरिष्ठ निरीक्षक, पाच निरीक्षक आणि इतर स्तरांवरील कर्मचाऱ्यांच्या नेमणुका होणार आहेत. या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची तत्त्वतः मंजुरी मिळाली असून, लवकरच उच्चाधिकार समितीकडून अंतिम मान्यता मिळण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे पुणे पोलिसांना कायदा व सुव्यवस्थेचे प्रभावी नियंत्रण ठेवण्यास मदत होईल आणि शहरातील गुन्हेगारीवर अंकुश लावण्यासाठी बळ मिळेल, असं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com