A.R. Rehman Concert: वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतानाही ए.आर. रेहमानांचा कार्यक्रम केला बंद; न्यायालयाच्या आदेशाचा दिला दाखला..

A.R.Rehman live concert In Pune: रविवारी (३० एप्रिल) रात्री पुणे स्टेशजवळच्या राजा बहादुर मिल मैदानात त्यांच्या संगीताची "लाईव्ह कॉन्सर्ट" सुरू होती.
Pune news
Pune newsSarkarnama

Pune Police Stopped A.R. Rehman Concert: हिंदी आणि तामिळ चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार आणि ऑस्कर पुरस्कार विजेते ए.आर.रेहमान यांची "लाईव्ह कॉन्सर्ट" पुणे पोलिसांनी स्टेजवर जाऊन बंद केली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. (Pune News)

काय आहे प्रकरण?

रविवारी (३० एप्रिल) रात्री पुणे स्टेशजवळच्या राजा बहादुर मिल मैदानात त्यांच्या संगीताची "लाईव्ह कॉन्सर्ट" सुरू होती. रेहमान यांचा कार्यक्रम रंगात आला होता.रात्री दहा वाजेपर्यंत कार्यक्रमाची वेळ नियोजित होती. पण १० वाजून गेल्यानंतरही कार्यक्रम सुरु होता. वेळेची मर्यादा ओलांडल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने स्टेजवर जाऊन खुद्द रेहमान यांनाच कार्यक्रम बंद केला.

Pune news
Employee Recruitment : सरकारी नोकर भरतीच्या कंत्राटदारांच्या पॅनेलमध्ये भाजप आमदार लाड यांची कंपनी

न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री 10 वाजेपर्यंतच स्पिकर वाजविण्यास परवानगी आहे.आयोजकांनी नियमांचे उल्लंघन केल्याने पोलिसांनी कार्यक्रम बंद केला. १० वाजून गेल्यानंतरही बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी स्वतः स्टेजवर येऊन रेहमान यांना कार्यक्रम बंद करायला सांगितले. तसेच स्टेजववरील वाद्यवृंदालाही त्यांची वाद्य बंद करण्याच्या सुचना दिल्या. (Pune Police)

विशेष म्हणजे, रेहमान यांच्या कार्यक्रमाला शहर पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.पण वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने नियमानुसार कार्यक्रम बंद करण्याच्या सूचना दिल्या. तर रेहमान यांनीदेखील पोलिस अधिकाऱ्याच्या सूचनांचा आदर करत कार्यक्रम थांबवला. हा सर्व प्रकार पाहून कार्यक्रमाला आलेल्या प्रेक्षकांसाठी मात्र हा अनपेक्षित धक्काच होता. त्यावरून बराच वेळ प्रेक्षकांमध्येही एकच गोंधळ उडाला होता. (

Pune news
Ajit Pawar on CM Post : जयंत पाटलांच्या तोंडात साखर पडो, त्यांचं म्हणणं खरं ठरो ; असं अजितदादा का म्हणाले ; video पाहा

दरम्यान, "न्यायाल्याच्या आदेशानुसार रात्री 10 वाजल्यानंतर स्पीकर वाजविण्यास बंदी आहे.कार्यक्रमाच्या आयोजकांना तशा सूचना आगोदर दिल्या होत्या. रात्रीचे 10 वाजल्यानंतर ही कार्यक्रम सुरू असल्याने आमच्या अधिकाऱ्यांनी स्टेजवर जाऊन कार्यक्रम बंद करण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी न्यायालयाच्या नियमांचे पालन केल्याचे परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील (Smartana Patil) यांनी म्हटलं आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com