Pune News, 24 Feb : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केल्याच्या मुद्द्यावरून पुण्यामध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष पेटला आहे. अशातच काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडे आणि त्यांच्या साथीदारांनी हल्ला केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
या हल्ल्यानंतर पुण्यातील राजकारण चांगलंच तापलं असून काँग्रेस नेत्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेत दामगुडे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसंच हनुमंत पवार यांना पोलीस संरक्षण द्यावं असं देखील निवेदन पोलिसांना दिलं आहे. दुसरीकडे तुषार दामगुडे यांना भाजपची फूस असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर तुषार दामगुडे यांनी सरकारनामाशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "हनुमंत पवार यांच्याकडून सातत्याने शिविगाळ आणि धमकावण्याचे प्रकार होत असतात. तोच प्रकार त्यांनी माझ्यासोबत देखील केला. एका माध्यमांच्या जाहीर डीबेटमध्ये त्यांनी अश्लील शिवीगाळ करत मला धमकावलं होतं. त्यामुळे अशा विकृतांना धडा शिकवणं गरजेचं होतं असं दामगुडे म्हणाले."
कालचा प्रसंग घडण्यापूर्वी हनुमंत पवार यांनी मला जीवे मारण्याची धमकी देत तुला ठोकतोच अशा शब्दात धमकावले होते. त्यानंतर आम्ही जे केले ती त्या धमकीवरील प्रतिक्रिया होती. तसंच ते जे आरोप करत आहेत की मी बंदूक दाखवली तर त्याबाबतचे सीसीटीव्ही उपलब्ध असून कुठेही मी बंदूक काढून रोखल्याचे त्यामध्ये दिसत नाही. त्यांचे हे आरोप धादांत कोठे आहेत.
मात्र, मी त्यांना योग्य प्रकारे धडा शिकवला आहे. त्याला तुम्ही मारहाण म्हणा अथवा धडा शिकवला असे म्हणा. मात्र त्यानंतर मला नक्षलवादी गट आणि दहशतवादी कारवाया करणार्यांकडून येणाऱ्या धमक्यांचा ओघ वाढला आहे. तसेच मी भाजपचा कार्यकर्ता असल्याचा आरोप होतोय हा खोटा आहे.
माझा भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट असा कोणताही संबंध नाही. जे मी भाजपचा कार्यकर्ता असल्याचा आरोप करत आहेत त्यांनी माझ्याकडे भाजपचे कोणते पद असेल अथवा मी भाजपची कोणतीही 2 रुपयाची पावती फाडली असेल त्याचा पुरावा त्यांनी द्यावा. उलट हनुमंत पवार यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्यांची सखोल चौकशी करण्यात यावी तसेच मला पोलीस संरक्षण देण्यात यावं अशी देखील मागणी दामगुडे यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.