Ravindra Dhangekar : आमदार झाले अन् धंगेकरांचे वजन घटले.. 

Pune Politics News : कसबा निवडणूक विजया नंतर रवीभाऊंचे राजकीय 'वजन' प्रचंड वाढले ...पण
Pune By-Election | Ravindra Dhangekar
Pune By-Election | Ravindra DhangekarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुण्यातील विशेषतः कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचा बुरुज पाडून काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर अर्थात, रवीभाऊंचे राजकीय 'वजन' प्रचंड वाढले. पण, आमदार झाल्यापासून गेल्या पाच-सहा महिन्यांत रवीभाऊंचे शारीरिक वजन मात्र, खूपच कमी झाले आहे. पुढची विधानसभा निवडणूक, तेव्हाची राजकीय गणिते, त्याची आतापासूनच जुळवाजुळव आणि भरीस भर म्हणजे, पुणे लोकसभा मतदारसंघात उमेदवार ठरण्याच्या शक्यतेने रवीभाऊंची धावपळ वाढली असून, त्यातून त्यांचे 20 किलो वजन घटल्याचे बोलले जात आहे.

'माझे वजन कमी झाले नाही. मी ते कमी करतोय,' असे सांगणाऱ्या रवी भाऊंच्या बोलण्यात खासदारकी लढण्याचा विश्वास लपून राहिला नाही. त्यामुळे शारीरिक वजन आटोक्यात ठेवणाऱ्या रवी भाऊंना पुढच्या काळात बरीच कसरत करावी लागणार असल्याचेही स्पष्ट आहे.पुण्यातील कसब्यातील भाजपचा हक्काचा मतदार आहे. या मतदारसंघात दिवंगत खासदार गिरीष बापट हे पाचवेळा आमदार राहिले. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत मुक्ता टिळकांनी कसब्याचे नेतृत्व केले. मुक्ता ताईंच्या निधनानंतरच्या पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Pune By-Election | Ravindra Dhangekar
Pune Bjp : पक्षाच्या सर्व्हे आधीच भाजप इच्छूकांचे दिल्लीश्वरांकडे साकडे

अवघ्या देशाच्या लक्ष वेधून घेतलेल्या या निवडणुकीत रवीभाऊंनी बाजी मारली. या निवडणुकीने रवीभाऊंचे राजकीय वजन सर्वच पक्षांत वाढले. त्यातून पुढे लोकसभा निवडणुकीतही रवीभाऊच काँग्रेसचे उमेदवार असल्याचे बोलले जात आहे. तशी तयारीही ते करीत असल्याचे खासगीत सांगण्यात येत आहे. ही लढाई थोडीशी लांब असली; तरी, पुढच्या साऱ्याच निवडणुकांत विरोधकांचे आव्हान राहणार असल्याची जाणीव ठेवणाऱ्या रवी भाऊंनी आपल्या कामाचा सपाटा सुरूच ठेवला आहे.

Pune By-Election | Ravindra Dhangekar
Rahul Gandhi : राहुल गांधींनी सांगितले संसदेतील घुसखोरीचे कारण... 

कसबा पेठेतील एका प्रभागामधून धंगेकर हे महापालिकेच्या निवडणुकीत विजयी झाले होते. शिवसेनेतून आपली राजकीय कारर्किदीची सुरूवात करणारे धंगेकर 2007 मध्ये मनसेच्या तिकीटावर पहिल्यांदा विजयी झाले होते. गेले २० वर्षापासून अधिक काळ ते राजकीय जीवनात सक्रिय आहेत. सकाळी लवकर उठून प्रभागातील नागरिकांशी चर्चा करणे, त्यांचे प्रश्न समजावून घेणे, त्यावर तातडीने सोडविणे हा त्याचा नित्यक्रम आहे. आमदारकीची निवडणूक लढताना देखील ते टू व्हिलरवर सर्व मतदारसंघात फिरत होते. आमदार झाल्यानंतरही त्यांच्या या कामात कोणताही खंड पडलेला नाही. प्रभागांसह मतदारसंघातील नागरिकांना आधार कार्ड, मतदार नोंदणी, यासह अनेक प्रकारचे दाखले नागरिकांना कमीत कमी वेळेत उपलब्ध व्हावेत, यासाठी धंगेकर सदैव आग्रही असतात.

Pune By-Election | Ravindra Dhangekar
Kolhapur News : 'तंटामुक्ती'च्या अध्यक्षपदावरून तंटा 

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांत उतरावे लागणार असल्याच्या शक्यतेने सध्या रवी भाऊंनी आपली यंत्रणा अधिक वेगाने कामाला लावल्याचे दिसत आहेत. अशातच रवीभाऊ नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात 'अॅक्टिव्ह' झाले आहेत. तेव्हाच, रवी भाऊंचे वजन कमी झाल्याचे दिसून आले. याआधी त्यांचे शारीरिक वजन हे 94 किलो इतके होते. ते आता कमी होऊन 74 किलो झाले. नागरिकांच्या कामासाठी कमी झालेल्या या वजनाची दखल घेत पक्ष श्रेष्टी त्यांचे पक्षातील वजन वाढणार का हे पुढील काही दिवसात स्पष्ट होणार आहे.

(Edited By -Sudesh Mitkar)

Pune By-Election | Ravindra Dhangekar
Hasan Mushrif : "केंद्राचे आभार, मात्र हा अर्धवट निर्णय "...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com