Jayant Patil On  Sharad Pawar : 'शरद पवारांकडून कोणीही वदवून घेऊ शकत नाही', जयंत पाटलांनी प्रशांत जगतापांच्या 'त्या' दाव्यातील हवाच काढली

Pune Politics Sharad Pawar  Prashant Jagtap : प्रशांत जगताप यांनी नुकतीच शरद पवारांची भेट घेतली. या भेटीत पवारांनी मविआला सोबत घेऊन निवडणूक लढण्याच्या सूचना केल्याचे त्यांनी सांगितले. यावर जयंत पाटलांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
Jayant Patil Sharad Pawar  Prashant Jagtap
Jayant Patil Sharad Pawar  Prashant Jagtapsarkarnama
Published on
Updated on

Jayant Patil News : पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन लढणार का? या विषयी चर्चा सुरू आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्यास विरोध केला आहे. त्यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली.

जगताप यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, महाविकास आघाडीला बरोबर घेऊनच निवडणूक लढविली जाईल, अशा सूचना पवार केली. दरम्यान, याबाबत जयंत पाटील यांना माध्यमप्रतिनिधींनी विचारले असता ते म्हणाले, "शरद पवार यांच्याकडून कोणीही वदवून घेऊ शकत नाही. आमची महाविकास आघाडी आहे. त्यात कोणाला आम्हाला सहकार्य करायचं असेल, त्याचा विचार पक्ष करेल. प्रशांत जगताप हेही शहराचे प्रमुख आहेत.आमचा पक्ष स्वतंत्र्य आहे."

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या आष्टी विधानसभा मतदारंघाचे अध्यक्ष राम खाडे यांच्यावर काही दिवसांपूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यात जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने खाडे यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खाडे यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी पाटील यांनी शनिवारी सायंकाळी खासगी रुग्णालयात भेट दिली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Jayant Patil Sharad Pawar  Prashant Jagtap
Nightclub Fire : नाईट क्लबमध्ये मृत्यूचा तांडव, 23 जणांनी गमावला जीव; मध्यरात्री नेमकं काय घडलं? पंतप्रधान मोदींनी घेतली दखल

जयंत पाटील म्हणाले, "राम खाडे यांच्यावर चार वेळा हल्ला झाला आहे, योग्य मार्गाने चुकीची काम उघड करणाऱ्या कार्यकर्त्यांना मारहाण होत असेल तर गंभीर प्रकार आहे. कोणी मारले, याचा अंदाज आहे, मात्र पोलिसांवर दबाव असल्याचे दिसत आहे."

...तो पर्यंत धस यांचे नाव घेणार नाही

बीडच्या पोलिसांना विनंती करून देखील संरक्षण देण्यात आले नाही. अकरा दिवस होऊनही अहिल्या नगरच्या पोलिसांना आरोपी सापडत नाहीत. कोणी मारले याचा अंदाज आहे, जोपर्यंत पूर्ण माहिती येत नाही, तोपर्यंत सुरेश धस यांचे नाव घेणार नाही, असे देखील पाटील म्हणाले.

Jayant Patil Sharad Pawar  Prashant Jagtap
Government Hospitals : विधानभवनाचे 'वैद्यकीय कक्ष'च व्हेंटिलेटरवर? डॉक्टर गैरहजर, मेयोत सुविधाच नाही; भाजप कार्यालातील कर्मचाऱ्याच्या जीवावर बेतलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com