भाजप कार्यालयातील कर्मचारी लहू गावकर यांना विधिमंडळ परिसरात अचानक हृदयविकाराचा झटका आला.
वैद्यकीय कक्षात डॉक्टर नसल्याने व मेयो रुग्णालयाने उपचार नाकारल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली.
अखेर त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सरकारी रुग्णालयांच्या व्यवस्थेवर कार्यकर्त्यांचा संताप व्यक्त होत आहे.
Nagpur News : राज्यातील महायुती सरकारचे हिवाळी अधिवेशन काहीच दिवसात नागपूर येथे सुरू होणार असून याची जय्यत तयारी सुरू आहे. अधिवेशनासाठी संपूर्ण मंत्रिमंडळ आणि आमदार व त्यांचे कर्मचारी नागपुरात दाखल होत आहे. मात्र येथे विधिमंडळ परिसरात आरोग्याची काळजी देवा भरोसे असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथे भाजप कार्यालातील स्टाफमधील एकाला अचानक हृदयविकाराचा झटका आला. पण त्याला विधिमंडळ परिसरतीरील वैदकिय कक्षात नेले असताना डॉक्टर गैर हजर होते. त्यामुळे त्या कर्मचाऱ्याच्या जीवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र तातडीने खासगी रूग्णालयात दाखल केल्याने ते आता सुखरूप आहेत. मात्र या प्रकाराने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये रोष दिसत आहे.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास सोमवारपासून (ता.8 डिसेंबर) सुरुवात होणार आहे. याची जोरदार तयारी सुरू असून अधिवेशनामुळे संपूर्ण सचिवालयाचे कामकाज मुंबईहून नागपूरला हलवण्यात आले आहे.
याचबरोबर संपूर्ण मंत्रिमंडळ आणि आमदार व त्यांचे कर्मचारी देखील नागपुरात दाखल होत आहेत. त्यामुळे सर्वांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विधिमंडळ परिसरात लोकप्रतिनिधीसाठी वैद्यकीय कक्ष उभारण्यात आला आहे. मात्र हा कक्ष आता किती तकलादू असल्याची प्रचिती राज्यात सत्तेत असणाऱ्या आणि त्यांचाच मुख्यमंत्री असणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना आलीय.
अधिवेशनासाठी संपूर्ण मंत्रिमंडळ आणि आमदार आणि राजकीय पक्षांचे स्टाफ नागपुरात दाखल होत आहेत. सर्वच पक्षांचे कार्यालये येथे उघडण्यात आली आहेत. याची जबाबजारी पक्षाने त्यांच्या कर्मचाऱ्यांकडे सोपवली आहे. भाजप कार्यालातील स्टाफही मुंबईतून नागपुरात दाखल झाला आहे.
दरम्यान भाजप कार्यालयात काम करणारे लहू गावकर नावाच्या एका कर्मचाऱ्याला आज विधिमंडळ परिसरात अचानक हृदयविकाराचा धक्का आला. त्यांना सर्वप्रथम विधिमंडळ परिसरतीरील वैदकिय कशात नेण्यात आले. मात्र इथे एकही डॉक्टर उपलब्ध नव्हता. ते बघून त्यांना तातडीने मेयो रुग्णालयात नेण्यात आले.
मात्र आशिया खंडातील सर्वात मोठे सरकारी आणि सत्ताधाऱ्यांचे लाडके रूग्ण्यालय अशी ख्याती असलेल्या मेयोमध्ये देखील त्यांच्या उपचारासाठी कुठलीच व्यवस्था नसल्याचे समोर आले आहे. तर असेच उत्तर त्या कर्मचाऱ्याला देवून परत पाठवण्यात आल्याचेही आता उघड झाले आहे.
शेवटी भाजपच्या कार्यकर्त्यांना धंतोलीतील एका खाजगी इस्पितळात गावकर यांना दाखल करावे लागले. सध्या त्यांची तब्येत स्थिर असल्याचे समजते. मात्र आपलीच सत्ता असताना भाजपच्या कर्मचाऱ्याला विधिमंडळ परिसरात वैद्यकीय कक्ष असताना डॉक्टर उपलब्ध झाला नाही. सरकारी रूग्णालयातही उपचार मिळाला नाही, यामुळे भाजपचे कार्यकर्ते रोष व्यक्त करीत आहेत. यावरून पुन्हा एकदा सरकारी इस्पळांची काय अवस्था आहे हे दिसून येते.
1. लहू गावकर यांना हृदयविकाराचा झटका कुठे आला?
विधिमंडळ परिसरात ते अचानक कोसळले.
2. वैद्यकीय कक्षात डॉक्टर का नव्हते?
ताबडतोब उपलब्ध डॉक्टर नव्हते, त्यामुळे प्राथमिक उपचारही मिळाले नाहीत.
3. मेयो रुग्णालयाने उपचार का नाकारले?
उपलब्ध सुविधा नसल्याचे कारण सांगून त्यांना परत पाठवण्यात आले.
4. अखेर त्यांना कुठे उपचार मिळाले?
धंतोलीतील एका खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले.
5. या घटनेवर भाजप कार्यकर्त्यांची काय प्रतिक्रिया आहे?
सरकारी रुग्णालयांच्या दुर्दशेबद्दल त्यांनी तीव्र रोष व्यक्त केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.