Pune Lok Sabha Election: तर पुणे लोकसभा बिनविरोध होणार?

कसबा पोटनिवडणुकीत झालेला पराभव भाजपाच्या जिव्हारी लागला आहे.
Pune Politics| Girish Bapat
Pune Politics| Girish Bapat Sarkarnama
Published on
Updated on

Pune Politics: कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत दुधाने तोंड पोळलेल्या भाजपा आता ताकही फुंकून पिणार असल्याची शक्यता आहे. खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर होणऱ्या पोटनिवडणूकीसाठी कुटूंबातीलच व्यक्तीला उमेदवारी देऊन, होणारी पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. यासाठी बापट यांच्या सुनबाई स्वरदा यांना उमेदवारी देण्याची गांभिर्याने चर्चा भाजपाच्या (BJP) गोटात सुरू आहे. (So Pune Lok Sabha will be unopposed?)

गिरीश बापट यांचे कसबा आणि पुण्यावर प्रभुत्व होते. बापट (Girish Bapat) यांनी विधासभा सोडून लोकसभा निवडणुक लढविण्याचा निर्णय पक्षाने घेतल्यानंतर, स्व. मुक्ता टिळक या कसब्यातुन आमदार झाल्या. मात्र आजारपणामुळे त्यांच्या अकाली निधनाने झालेल्या पोटनिवडणुकीत टिळक कुटूंबीयांपैकी एकाला उमेदवारी मिळण्याची आशा त्यांना होती.

Pune Politics| Girish Bapat
Pune Loksabha By-Elelction : पुण्याची लोकसभेची निवडणूक लागणार; भाजपकडून 'या' नावांची चर्चा

यामध्ये टिळक यांचे पती शैलेश आणि मुलगा कुणाल यांच्या नावाची चर्चा होती. मात्र या दोघांना उमेदवारी न देता नगरसेवक आणि सलग तीन वेळा स्थायी समितीचे अध्यक्ष राहिलेल्या हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्याने ब्राह्मण समाज आणि टिळक कुटूंबीय नाराज झाले होते. हि नाराजी त्यांनी बोलून देखील दाखविली. या नाराजीचा फटका भाजपाला बसला आणि हक्काचा मतदारसंघ गमवावा लागला. या निवडणुकीची देशभर चर्चा झाली. आणि पुणेकरांना केलेला बदल देशात होते अशी चर्चा सुरू झाली.

कसबा पोटनिवडणुकीत झालेल्या पराभव भाजपाच्या (BJP) जिव्हारी लागला. हा पराभवाची पुनरावृत्ती आगामी येणाऱ्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत होऊ नये यासाठी भाजपाने आता ताकही फुंकून पिण्याची भूमिका घेतली आहे. यासाठी आता दिवंगत गिरीष बापट यांच्या कुटूंबातच उमेदवारी देऊन, हि निवडणुक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे प्रयत्न भाजपाच्या चाणक्यांनी सुरू केले आहेत. यासाठी बापट यांच्या सुनबाई स्वरदा बापट यांचे नाव आघाडीवर असून, स्वरदा यांना उमेदवारी दिल्यास इतर पक्ष देखील सामंज्यस्याची भूमिका घेत पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची दाट शक्यता आहे.

Pune Politics| Girish Bapat
Rahul Gandhi Granted Bail: मोठी बातमी! राहुल गांधींना जामीन मंजूर

शरद पवार, राज ठाकरे मांडणार भूमिका

दिवंगत गिरीश बापट यांचे सर्वपक्षीय संबध अतिशय जिव्हाळ्याचे होते. तर बापट हे शहरातील विविध पक्षांच्या कट्टावरील गप्पांसाठी प्रसिद्ध होते. विविध पक्षातील त्यांची मैत्री जगजाहिर आहे. यामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे नेते राज ठाकरे, यांच्यासह बापट यांच्या विरोधात दोनदा लोकसभा निवडणूक लढलेले कॉंग्रेसचे मोहन जोशी, शांतीलाल सुरतवाला, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अंकुश काकडे, कसब्यातुन नुकतेच आमदार झालेले रविंद्र धंगेकर यांचा समावेश आहे. यासर्वांच्या सामज्यस्याच्या भुमिकेतुन लोकसभा पोटनिडणुक बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे.

पोटनिडणूक बिनविरोध करून, मोहोळ यांचा मार्ग होणार सुकर

स्वरदा बापट यांना उमेदवारी देऊन, लोकसभेची पोटनिवडणुक बिनविरोध करून, भाजपा २०२४ च्या निवडणुकीत मुरलीधर मोहोळ यांच्या खासदार होण्याचा मार्ग सुकर होण्याची दाट शक्यता आहे. २०२४ च्या निवडणुकीसाठी कसब्याचे कॉंग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर आणि मोहोळ यांच्यात लढतीची चाचपणी महाविकास आघाडी आणि भाजपाकडुन सुरू असल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com