Pune News: पुण्यातील कल्याणी नगर भागात झालेल्या भीषण अपघातात (Pune Porsche Accident) दोन जीव गमवावे लागले. या अपघातानंतर रोज नवीन माहिती समोर येत आहे. दारुच्या नशेत पोर्शे गाडी चालवत दोघांना चिरडणारा अल्पवयीन आरोपीची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. अग्रवाल कुटुंबाचे अंडरवर्ल्डशी संबंध समोर आल्यानंतर या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळत आहे.
राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे (Sonali Tanpure) यांनी आपल्या मुलाबाबत समाज माध्यमावर केलेल्या पोस्टवरुन वेदांत यांची शाळेत वागणुक कशी होती, याबाबत धक्कादायक माहिती दिली आहे.
या कार अपघातानंतर पुन्हा एकदा त्या गोष्टी आठवल्या...,असे सांगत सोनाली तनपुरे यांनी आपला मुलाला शाळेत झालेल्या त्रासाविषयीची माहिती दिली आहे. वेदांत यांच्या शाळेतील वाईट प्रवृत्तीबाबत त्यावेळी दखल घेतली असती तर असा भयंकर गुन्हा कदाचित घडला नसता, असे सोनाली यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
या घटनेतील मुलगा (वेदांत) हा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता. त्यावेळी त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास झाला होता. या मुलांची तक्रार मी त्यांच्या पालकांकडे केली होती. मात्र योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी या मुलांच्या त्रासाला कंटाळून त्याची शाळा बदलावी लागली. त्या घटनांचा वाईट परिणाम आजही त्याच्या मनावर आहे," असे सोनाली तनपुरे यांनी सांगितले आहे.
"अपघातात सुशिक्षित तरुण तरुणीचा निष्पाप बळी गेला. त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली. या कुटुंबांना न्याय मिळायला हवा," असे त्या म्हणाल्या.
अपघातात नुकताच एक मोठा आणि धक्कादायक खुलासा समोर आला आहे. अग्रवाल कुटुंबीयांचे गुन्हेगारी जगाशी संबध असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर आधीही काही गंभीर गुन्हे दाखल आहेत.
विशाल अग्रवाल यांचे वडील सुरेंद्र कुमार अग्रवाल यांचे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनशी संबंध आहेत. तसेच, त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल असल्याचे समजते. त्या मुलाचे वडील विशाल अग्रवाल हे सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.