Pune Porsche Accident News : दोघांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन मुलानं दोन तासात पबमध्ये उडवली 'एवढी' रक्कम

Pune Court On Porsche Accident : अल्पवयीन मुलांना मद्यदिल्याप्रकरणी न्यायालयानं हॉटेल आणि बारचालक यांना 24 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
vedant agrawal
vedant agrawal sarkarnama
Published on
Updated on

Pune Hit And Run Case News in Marathi, 22 May : पुण्यातील कल्याणीनगरमध्ये रविवारी मध्यरात्री भरघाव वेगातील आलिशान पोर्श कारनं (Pune Porsche Accident) दुचाकीला धडक दिली. यात दोघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तरूण, तरूणीचा समावेश आहे.

पोर्शनं दिलेली धडक इतकी भयंकर होती की दोघेही हवेत काही फूट उडून रस्त्यावर पडले. धक्कादायक बाब म्हणजे कार चालक आरोपी अल्पवयीन आहे. तो पबमधून मद्यपान करून निघाल्याचं सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. पण, अल्पवयीन मुलानं पबमध्ये दोन तासांत किती रक्कम उडवली? याची माहिती समोर आली आहे.

कल्याणीनगर अपघात प्रकरणात (Pune Hit And Run Case) गुन्हा दाखल झालेल्या बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल (Vishal Agarwal) यांच्या अल्पवयीन मुलानं शनिवारी रात्री मित्रांबरोबर पार्टी केली. तेव्हा, दोन तासात मद्य आणि जेवणावर 48 हजार खर्च केल्याची माहिती त्यानं पोलिसांना दिली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नुकताच अल्पवयीन मुलाच्या बारावीचा निकाल लागला होता. त्यामुळे रविवारी रात्री मित्रांबरोबर तो पार्टी करण्यासाठी गेला होता. पार्टीसाठी जाताना त्यानं वडिलांकडून पोर्श ही कार घेतली होती. अल्पवयीन मद्यप्रशान करतो, याची कल्पना विशाल अगरवाल यांना होती.

मुलानं मुंढव्यातील हॉटेल 'कोझी' आणि हॉटेल 'ब्लॅक'मध्ये मद्यप्रशासन केलं. तेथे मुलानं मित्रांबरोबर जेवण केलं. दोन तासात मुलानं मद्यपार्टीवर 48 हजार रूपये खर्च केले. पोलिसांनी दोन्ही हॉटेलमधील सीसीटीव्ही व्हिडीओ तपासले.

त्यात मुलानं आणि त्याचे मित्र मद्यप्रशासन करत असल्याचं आढळलं आहे. तसेच, हॉटेलमधील बिल अल्पवयीन मुलानेच दिल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी ऑनलाइन बिल दिल्याच्या नोंदी तपासासाठी ताब्यात घेतल्या आहेत.

दरम्यान, कल्याणीनगर अपघात प्रकरणात कारचालक अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या मित्रांना वयाची खातरजमा न करता मुंढव्याती 'कोझी' आणि 'ब्लॅक' पबमध्ये प्रवेश देऊन मद्य दिले होते. त्याप्रकरणी 'कोझी' हॉटेल अँड बारचे मालक प्रल्दाद भुतडा, नमन भुतडा आणि व्यवस्थापक सचिन काटकर आणि हॉटेल 'ब्लॅक'चे व्यवस्थापक संदीप सांगळे, बार काउंटर जयेश बोनकरविरुद्ध मोटारवाहन अधिनियम 1988 चे कलम 3,5, 199 ( अ ) न अल्पवयीन न्याय ( मुलांची काळजी व संरक्षण कायदा 2015 ) कलम 77, 75 नुसार येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

vedant agrawal
Pune Porsche Accident News : पब चालविणे गंमत आहे का? न्यायालयाचे खडेबोल; नेमकं काय घडलं?

मंगळवारी पोलिसांनी हॉटेल 'कोझी'चे मालक नमन भुतडा, सचिन काटकर, संदीप सांगळे यांना न्यायालयात हजर केले होते. न्यायालयानं 24 पर्यंत त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे.

vedant agrawal
Pune Porsche Accident: 'त्या' मुलामुळे माझ्या मुलाला खूप त्रास झाला...; राष्ट्रवादी नेत्याच्या पत्नीला आठवल्या कटू गोष्टी ...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com