Porsche Car Accident Case : विशाल अगरवाल पळाला? नेमकं काय झालं पोलिसांनी सांगितलं

Vishal Agarwal And Hinjewadi Police : पुण्यातील बावधानमधील एका सोसायतील 72 जणांची फसवणूक केल्याप्रकरणी अगरवाल यांना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे.
Vishal Agarwal
Vishal AgarwalSarkarnama
Published on
Updated on

Pune Crime News : कल्याणीनगर अपघातातील अल्पवयीन आरोपीच्या वडीलासह आई, आजोबा यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर आरोपीचे वडील विशाल अगरवाल याच्यावर विविध प्रकरणातून अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत.

पुण्यातील बावधानमधील एका सोसायतील 72 जणांची फसवणूक केल्याप्रकरणी अगरवाल यांना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. मात्र ते पोलिसांच्या ताब्यातून फरार झाल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. यावर पोलिसांनी ही अफवा असल्याचे स्पष्ट करून खुलासा केला आहे.

अपघातानंतर श्रीमंताच्या अल्पवयीन मुलाला व्हिआयपी वागवणूक दिल्याचा आरोप पुणे पोलिसांवर झाला होता. त्यातून पुणे पोलिसांच्या कारभारावर संशय घेतला गेला. त्यानंतर मुख्य आरोपीचे वडील विशाल अगरवाल यालाही विविध गुन्ह्यांतर्गत पुणे पोलिसांनी अटक केली. आता अगरवाल याला सोयाटीतील ७२ जणांची फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल होताच हिंजवडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हिंजवडी पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर कमालीची गुप्तता बाळगली होती. त्यामुळे पोलिासांवरच पिंपरी - चिंचवड परिसरातून संशय व्यक्त केला जात आहे. त्यानंतर विशाल अगरवाल हा पोलिसांच्या ताब्यातून पळाल्याची माहिती चर्चा सुरू झाली. यावर पोलिसांनी सुरुवातीला पाळलेले मौन सोडले आहे. शहरात होणारी चर्चा ही अफवा असून अगरवाल पोलिसांच्या ताब्यात सुरक्षित असल्याचा खुलासा पोलिसांनी केला.

Vishal Agarwal
T-20 World Cup : राज्य सरकार गुजरातच्या 'आका'समोर झुकले; T-20 जल्लोषावरून नाना पटोलेंचा हल्लाबोल, नेमकं काय झालं?

याबाबत हिंजवडी ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैया थोरात म्हणाले, विशाल अगरवालच्या विरोधात बावधनमधील मोठ्या सोसायटीतील लोकांची फसवणूक केल्याची तक्रार आली. त्यानुसार गुन्हा दाखल करून अगरवाल याला अटक केली आहे.

पुणे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अगरवाल याला न्यायालयाच्या परवानगीनंतर आपल्या ताब्यात घेतले. आता तो पोलिसांच्या ताब्यातून फरार झाल्याची माहिती व्हायरल होत आहे, मात्र ती पूर्णपणे अफवा आहे. तो आमच्या ताब्यात असून सुरक्षित आहे, असा खुलासा पोलिसांनी केला आहे.

Vishal Agarwal
Bachchu Kadu : आमचे दोन आमदार आले तरी मुख्यमंत्र्यांना झुकावं लागेल; बच्चू कडूंचा आक्रमक बाणा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com