Porsche Accident Update : कल्याणीनगर पोर्श कार अपघात प्रकरणात अजितदादांचा मोठा गौप्यस्फोट!

Pune Porsche Accident : वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे हे मध्यरात्री पोलिस स्टेशनला गेले होते. दुचाकीवरून जाणाऱ्या या दोन्ही तरूण-तरूणीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या या मुलाला सोडावे, यासाठी टिंगरे दबाव टाकत असल्याचा आरोप केला जात होता.
Ajit Pawar - Pune Porsche car
Ajit Pawar - Pune Porsche car Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : दोन महिन्यांपूर्वी कल्याणीनगर येथील पोर्श कार अपघात प्रकरणात वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील टिंगरे यांची तीन ते चार तास चौकशी झाली. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनीच हा गौप्यस्फोट केला आहे. मात्र या प्रकरणामध्ये टिंगरे यांचा दुरान्वये संबध नसल्याचेही चौकशीत समोर आल्याचे अजित पवार म्हणाले.

दोन महिन्यांपूर्वी कल्याणीनगर भागात भरधाव वेगाने जाणाऱ्या पोर्श कारने एका दुचाकीला जोरदार धडक दिली होती. मध्यरात्री अडीच ते पावणेतीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला होता. ही धडक इतकी जबरदस्त होती की, दुचाकीवर पाठीमागे बसलेली तरूणी हवेत उडून रस्त्यावर पडली होती.

तिचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीस्वार तरूणाचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. या घटनेनंतर गाडी चालविणाऱ्या तरूणाला गाडीतून बाहेर काढून नागरिकांनी चांगलाच चोप देत त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले होते. गाडी चालविणारा हा तरूण दारू पिऊन गाडी चालवित असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी पोलिसांना सांगितले होते.

Ajit Pawar - Pune Porsche car
Sunil Shelke : काही नेत्यांना साहेब अन दादांना एकत्र येऊ द्यायचे नाही; सुनील शेळकेंचा रोख कुणाकडे?

या तरुणाला पोलिस (Police) स्टेशनमध्ये नेल्यानंतर संबधित तरुण हा प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांचा मुलगा असल्याचे समोर आले होते. तसेच तो अल्पवयीन असल्याची माहिती पुढे आल्यानंतर वरिष्ठ स्तरावरून त्याला सोडविण्यासाठी सुत्रे हलविली जात होती. पोलिसांवर देखील दबाव टाकला जात होता.

वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे हे मध्यरात्री पोलिस स्टेशनला गेले होते. दुचाकीवरून जाणाऱ्या या दोन्ही तरूण-तरूणीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या या मुलाला सोडावे, यासाठी टिंगरे दबाव टाकत असल्याचा आरोप केला जात होता. या प्रकरणात आमदार टिंगरे यांचे नाव गोवल्याने ते चांगलेच चर्चेत आले होते.

यावर अजित पवार यांनी आतापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र आता अजितदादांनी आमदार टिंगरे यांची पोर्श कार अपघात प्रकरणात चौकशी झाल्याचे सांगितले. तीन-चार तास टिंगरे यांची चौकशी करण्यात आली. त्यामध्ये जे काही घडले ते सुनीलने स्पष्ट सांगितले. यात टिंगरे यांचा दुरान्वये देखील संबंध नव्हता.

मात्र कारण नसताना काही जणांनी त्यांचे नाव यामध्ये गोवण्याचा प्रयत्न केला. आपल्या मतदारसंघात काही प्रकार घडला असेल तर तिथल्या आमदाराला रात्री जाणे भाग आहे. आधार देणे हे त्याचे कर्तव्य आहे. घटनास्थळी काय घडले आमदाराला पोलिस स्टेशनमध्ये गेल्यावरच कळणार ना, अगोदर काय त्याला काय स्वप्न पडणार का? असेही अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar - Pune Porsche car
Video Devendra Fadnavis : अजितदादांसोबत युती का केली? फडणवीसांनी सांगितली शिवरायांची नीती

सामाजिक जीवनात काम करताना पक्षाची कोणतीही बदनामी होईल, असे कोणतेही काम होऊ देऊ नका, असे आवाहन अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले. मधल्या काही काळात पुण्याला बदनाम करणाऱ्या काही घटना झाल्या. त्या प्रकरणात कडक अॅक्शन घेण्यास कोणीही मागे पु़ढे पाहिले नाही.जे कोणी त्या प्रकरणात होते त्यांच्या चौकशा करून त्यांच्यावर कारवाई केली. परंतु अशा काही घटना घडल्या तर यामध्ये काही चांगले देखील भरडले जातात, असे अजित पवार म्हणाले. पक्षाचे नाव खराब होईल, असे कोणतेही काम होणार नाही, याकडे लक्ष द्यावे, असेही त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com