Sunil Shelke : काही नेत्यांना साहेब अन दादांना एकत्र येऊ द्यायचे नाही; सुनील शेळकेंचा रोख कुणाकडे?

Sharad Pawar And Ajit Pawar : अजितदादांनी आपल्या राजकीय जीवनात राज्याला पुढे नेण्याचे काम केले. अशा अजितदादांनाही राष्ट्रवादीत येऊ न देणे, राष्ट्रवादीतील फुटीचा फायदा घेण्याचा प्रयत्न काही मंडळी करत आहेत.
Sunil Shelke
Sunil ShelkeSarkarnama
Published on
Updated on

Pune Political News : राष्ट्रवादी काँग्रस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जुन्नरचा दौरा केला. त्यावेळी अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांनी त्यांच्याशी चर्चा केली. त्यावरून जिल्ह्यात तर्कवितर्कांना उधाण आले. त्यानंतर बेनकेंनी अजित पवार आणि शरद पवार भविष्यात एकत्र येतील, असे विधान केले.

आता, तसे झाले तर आम्हाला आनंदच होईल पण काही महत्वाकांक्षी नेत्यांना त्यांना एकत्र येऊ द्याचे नाही, असे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले. यावर शेळकेंचा रोख नेमका कुणाकडे आहे, अशी आता चर्चा सुरू झालेली आहे.

सुनील शेळके Sunil Shelke म्हणाले, शरद पवार जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी बनकेंनी त्यांचे स्वागत केले. त्यावेळी त्यांच्यात कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा झालेली नाही. परंतु राजकारणातील घडामोडी पाहिल्या तर कोण कुठल्या पक्षात जाईल, आणि युती होईल याचा काही भरोसा राहिलेला नाही. भविष्यात पवार साहेब आणि अजितदादा एकत्र आले तर आम्हाला आनंदच होईल, असेही शेळकेंनी स्पष्ट केले.

परंतु हल्लीच्या राजकारणात काही मंडळी महत्वाकांक्षा ठेवून आहेत. त्यांना राज्याच्या राजकारणात मोठे व्हायचे आहे. आपल्याला महत्त्वाची जबाबदारी कशी मिळेल, असे स्वप्न त्यांना पडू लागले आहेत. त्यांना हे दोघांना एकत्र येऊ द्यायचे नाही. त्या व्यक्ती कोण आहेत, हे सर्व महाराष्ट्राला आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना माहिती आहे. कुणाला महाराष्ट्रातील मोठे नेते होण्याची स्वप्ने पडतात, असेही शेळकेंनी कुणाचेही नाव न घेता सांगितले.

Sunil Shelke
Amit Shah Pune : 'मै बनिया का बेटा हूं, गॅरंटी के बगेर वापस नहीं जाऊंगा!'; अमित शाह असं का म्हणाले?

संपूर्ण राज्याला माहिती आहे, की अजितदादांनी Ajit Pawar आपल्या राजकीय जीवनात राज्याला पुढे नेण्याचे काम केले. अशा अजितदादांनाही राष्ट्रवादीत येऊ न देणे, राष्ट्रवादीतील फुटीचा फायदा घेण्याचा प्रयत्न काही मंडळी करत आहेत. मात्र शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले तर मला व्यक्तिगत आनंद आहे. असे असले तरी मी पहिल्यापासून अजितदादांसोबत आहे. आणि भविष्यातही त्यांच्यासोबतच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Sunil Shelke
Nitin Gadkari News : ...म्हणून नितीन गडकरी भाजपच्या पुण्यातील अधिवेशनाला होते अनुपस्थित!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com