कोरोना लसीकरणात पुणे राज्यात दुसऱ्या स्थानी

४३ लाख ५४ हजार ३०६ जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत.
Corona
CoronaSarkarnama
Published on
Updated on

पुणे : पुणे जिल्ह्यातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक पहिला आणि दुसरा डोस मिळून मागील दहा महिन्यांत १ कोटी २१ लाख ३४ हजार ४२८ डोस दिले आहेत. कोरोना लसीकरणात पुणे जिल्ह्याने राज्यात दुसरे स्थान कायम राखले आहे. या लसीकरणात प्रथमपासून मुंबई अव्वल स्थानी कायम राहिली आहे. जिल्ह्यातील एकूण डोसपैकी ७७ लाख ८० हजार १२२ नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. यापैकी ४३ लाख ५४ हजार ३०६ जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत.

आतापर्यंत पुणे शहरातील नागरिकांनी सर्वाधिक ५० लाख ७२ हजार ३८ डोस घेतले आहेत. त्यानंतर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा डोस घेण्यात जिल्ह्यात दुसरा क्रमांक लागतो. ग्रामीण भागातील नागरिकांनी पहिला व दुसरा डोस मिळून ४७ लाख ५१ हजार ७५२ कोरोना लसीकरणाचे डोस घेतले आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील नागरिकांनी २३ लाख १० हजार ६३८ डोस घेतले आहेत.

Corona
‘सीआयडी’ मालिका पाहून पंधरा वर्षीय मुलांनी केला वृद्धेचा खून

पुणे जिल्ह्यात १६ जानेवारी २०२१ पासून कोरोना लसीकरण सुरु झाले आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना ही लस देण्यास सुरवात करण्यात आली होती. कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा १ मार्च २०२१ पासून सुरु झाला. या टप्प्यात ६० वर्षे वयापुढील सर्व नागरिकांना लस देण्यास सुरवात केली. त्यानंतर १ एप्रिलपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला. या टप्प्यात सहव्याधी असलेले ४५ वर्ष वयापुढील नागरिक आणि ज्येष्ठ नागरिकांना तर, चौथ्या टप्प्यात १८ वर्षांपुढील सर्वांना लस देण्यास सुरवात केली आहे. चौथा टप्पा हा १ मे २०२१ पासून सुरु झाला आहे.

Corona
पीएमपी कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार; पण…

जिल्ह्यात महिनानिहाय झालेले लसीकरण (दोन्ही डोस मिळून)

- जानेवारी ते मार्च २०२१ --- ८ लाख ८४ हजार १२०

- एप्रिल २०२१ --- १४ लाख ८३ हजार २९८

- मे --- ५ लाख ४३ हजार ४७३

- जून --- १५ लाख २८ हजार ९६६

- जुलै --- १७ लाख ८१ हजार ५६१

- आॅगस्ट --- १८ लाख ७८ हजार ५४३

- सप्टेंबर --- २४ लाख ३७ हजार १४१

- आक्टोबर --- १५ लाख ९७ हजार ३२६

- जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाचे एकूण उद्दिष्ट --- ८३ लाख ४२ हजार ७००

- एकूण उद्दिष्टापैकी पहिला डोस घेतलेले नागरिक --- ७७ लाख ८० हजार १२२

- दोन्ही डोस पूर्ण झालेले नागरिक --- ४३ लाख ५४ हजार ३०६

संवर्गनिहाय पहिला डोस पूर्ण झालेले

- आरोग्य कर्मचारी --- १ लाख ६१ हजार ४८०

- फ्रंट लाइन वर्कर्स --- २ लाख ६८ हजार १६३

- ६० वर्षांपुढील नागरिक --- ११ लाख ८१ हजार ८६८

- ४५ ते ५९ वयोगटातील नागरिक --- १५ लाख ८५ हजार ७०१

- १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिक --- ४५ लाख ८२ हजार ९१०

संवर्गनिहाय दोन डोस पूर्ण झालेले नागरिक

- आरोग्य कर्मचारी --- १ लाख ३८ हजार ८०१

- फ्रंट लाइन वर्कर्स --- २ लाख २९ हजार २४७

- ६० वर्षांपुढील नागरिक --- ८ लाख ७३ हजार ९६३

- ४५ ते ५९ वयोगटातील नागरिक --- १० लाख ७४ हजार ५०६

- १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिक --- २० लाख ३७ हजार ७८९

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com