नवरा-बायकोच्या भांडणात पोलीस हवालदारानं मागितली लाच अन् हातात पडल्या बेड्या

पत्नीच्या पतीविरुद्धच्या अदखपात्र तक्रारीची दखल न घेण्यासाठी पोलीस हवालदाराने लाच घेतल्याचे समोर आले आहे.
Bribery
BriberyFile Photo
Published on
Updated on

पिंपरी : एफआयआर (FIR) म्हणजे दखलपात्र गुन्ह्यात पोलीस (Police) अटकेसारखी कारवाई करतात. अदखपात्र गुन्हा म्हणजे `एनसी`त त्यांना ती करता येत नाही. अपवादात्मक परिस्थितीत ती करायची झाल्यास न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते. तरीही एका एनसीच्या प्रकरणामध्ये पुणे ग्रामीणच्या पोलीस हवालदाराने लाच मागितली. या प्रकरणी त्याला अटक झाली आहे. विशेष म्हणजे, पती आणि पत्नीच्या भांडणासंदर्भातील ही तक्रार होती.

तळेगाव दाभाडे (ता.मावळ,जि.पुणे) पोलीस ठाण्यातील हवालदाराने दहा हजार रुपये लाच मागितली होती. नंतर तीन हजार रुपयांवर तडजोड करण्यात आली. या हवालदाराला अटक झाली आहे. अतिशय किरकोळ प्रकरणातही पोलीस लाच घेतल्याचा प्रकार यामुळे समोर आला आहे. तसेच, ग्रामीण भागातील कायद्याच्या अज्ञानाचा पोलीस कसा गैरफायदा घेतात,हे या प्रकरणातून सिद्ध झाले आहे. नमूद करण्योजोगी बाब म्हणजे नवरा,बायकोच्या किरकोळ भांडणाचा गैरफायदा घेत या हवालदाराने लाच खाल्ली.

Bribery
बंडातात्यांवर अमृता फडणवीस भडकल्या अन् म्हणाल्या...

संतोष पांडुरुंग माने (वय ४५) असे या पोलीस हवालदाराचे नाव आहे. एका ३२ वर्षीय विवाहित तरुणाकडून ही लाच घेण्यात आली. या तरुणाविरुद्ध त्याच्या पत्नीन पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून त्याच्याविरुद्ध एनसी दाखल करण्यात आली होती. त्यात कारवाई करण्याची भीती मानेने या तरुणाला दाखवली. ती करायची नसेल,तर दहा हजाराची मागणी केली. तीन हजारावर तडजोड होऊन ती घेताना माने पकडला गेला. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) डीवायएसपी शीतल घोगरे, पीआय संदीप वर्हाडे, पोलिस नाईक किरण चिमटे,पोलिस शिपाई रियाज शेख,माळी व पोलिस चालक दिपक दिवेकर या पथकाने ही कारवाई केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com