बंडातात्यांवर अमृता फडणवीस भडकल्या अन् म्हणाल्या...

कीर्तनकार बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) हे वादग्रस्त वक्तव्य करुन अडचणीत आले आहे.
Amruta Fadnavis Slams Bandatatya Karadkar
Amruta Fadnavis Slams Bandatatya Karadkar
Published on
Updated on

सातारा : कीर्तनकार बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) हे वादग्रस्त वक्तव्य करुन अडचणीत आले आहेत. राजकारण्यांची मुले दारू पितात, असे विधान त्यांनी केले होते. याचे पुरावे मागितल्यास तेही देऊ, असे जाहीर आव्हानही त्यांनी दिले होते. अखेर हे प्रकरण अंगाशी येताच त्यांनी माफी मागून अंग काढून घेतले आहे. आता यावरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी बंडातात्यांना सुनावले आहे. (Amruta Fadnavis Slams Bandatatya Karadkar)

बंडातात्यांच्या वक्तव्यावर बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, स्त्रियांनी आधीच आपल्या देशात खूप भोगले आहे. त्यामुळे स्त्रियांवर टिप्पणी करणे आणि त्यांच्या खासगी आयुष्यावर बोलणे चुकीचे आहे. त्यापासून दूर राहायला हवे. आपल्या देशात नेहमी हेच घडत आले आहे. कुणी काही बोलले की त्यावर आपण आंदोलन करतो. खरे तर या गोष्टी मानसिकतेशी संबंधित आहे. काय बोलावे आणि काय बोलू नये, हे आपणच ठरवावे.

स्त्रियांवर अत्याचार झाल्यानंतर आपण बोलतो अथवा कारवाई करतो. आपल्याला आपल्या मानसिकतेत आता मोठा क्रांतिकारी बदल करावा लागेल. खासगी आयुष्य आणि राजकारण या दोन गोष्टी वेगळ्या ठेवायला हव्यात. खासगी आयुष्यावर टीकाटिप्पणी करणे टाळावे. एखाद्या नेत्याने पत्नीला भागीदार केले, तिला काही कंपनीत हिस्सा दिला. तिथे जर गैरव्यवहार झाला असेल तर त्याबाबतही सावध भूमिका घ्यायला हवी, असेही अमृता फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Amruta Fadnavis Slams Bandatatya Karadkar
मी क्षमा मागतो! अडचणीत येताच बंडातात्या माफी मागून झाले मोकळे!

राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन (Wine) विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर विविध स्तरातून टीका केली जात आहे. विरोधी पक्ष असलेल्या भाजपसह काही सामाजिक कार्यकर्त्यांनीही या निर्णयावरून सरकारवर टीकेची झोड उठवली. कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनीही साताऱ्यात 'दंडवत दंडुका' या आंदोलनाद्वारे सरकारच्या वाईन विक्रीबाबतच्या निर्णयाचा विरोध केला. त्यावेळी त्यांनी राजकीय नेत्यांवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते.

Amruta Fadnavis Slams Bandatatya Karadkar
डिसले गुरूजी गाजवणार जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा

दरम्यान, सातारा पोलिसांनी (Satara Police) बंडातात्यांना ताब्यात घेतले असून, त्यांना लवकरच अटक केली जाणार आहे. बेकायदा आंदोलन केल्याप्रकरणी बंडातात्या यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे. बेकायदा आंदोलन करणे, कोविडचे नियम न पाळता आंदोलन करणे यासह इतर नियमांचा भंग केल्याप्रकरणी बंडातात्या कराडकर यांच्यासह इतर कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. चिथावणीखोर भाषण केल्याचीही नोंद तक्रारीत करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com