Pune Shocking News: खळबळजनक ! शिवाजीनगर न्यायालयाच्या इमारतीवरुन उडी मारली; कारणही आलं समोर

Pune News: पुणे शहरातील गुन्हेगारी घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अशातच पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे
Pune District Court  (1).jpg
Pune District Court (1).jpgSarkarnama
Published on
Updated on

Pune News :पुणे शहरातील गुन्हेगारी घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अशातच पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. न्याय मिळत नसल्यामुळे शिवाजीनगर न्यायालयाच्या (Pune Court) इमारतीवरुन उडी घेऊन एकानं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे न्यायालयासह संपूर्ण पुणे शहरातच खळबळ उडाली आहे.

पुणे शहरात बुधवारी(ता.15 ऑक्टोबर) रोजी दुपारी ही घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आपल्याला न्याय मिळत नसल्याची भावनेमुळे अखेर संबंधित व्यक्तीनं टोकाचं पाऊल उचलल्याचे समोर येत आहे.

शिवाजीनगर जिल्हा न्यायालय इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून तरुणाने उडी मारत जीवन संपवत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तरुणाशी संबंधित प्रकरणाची न्यायालयात सुनावणी होती. पण न्याय मिळत नसल्यामुळे या तरुणानं टोकाचं पाऊल उचलल्यामुळे खळबळ उडाली. या घटनेनंतर शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

Pune District Court  (1).jpg
Ram Shinde VS Rohit Pawar : रोहित पवारांवर राम शिदेंचा पलटवार, पासपोर्ट प्रकरणात धक्कादायक खुलासा; म्हणाले, 'घायवळच्या मामानेच...'

ही घटना पुणे (Pune) जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या परिसरात घडली. केस चालत नाही, न्याय मिळत नाही, यामुळे संतप्त झालेल्या पक्षकारानं थेट चौथ्या मजल्यावरून उडी घेतली. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. तो सध्या बेशुध्द अवस्थेत असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. या धक्कादायक घटनेमुळे न्यायालय परिसरात मोठा गोंधळ उडाला. बघ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com