
Prakash Ambedkar Demands Action : पुण्यातील स्वागरेट बसस्थानकात युवतीवर अत्याचार प्रकरणात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री योगेश कदम यांनी केलेल्या असंवेदनशील विधानांवर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर चांगलेच संतापले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशांना मंत्रिमंडळात का ठेवले पाहिजे? असा स्वतःला प्रश्न केला पाहिजे. अशा असंवेदनशील मंत्र्यांना कॅबिनेटमधून, मंत्रिमंडळातून काढून टाकावे, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यातील स्वारगेट प्रकरणात मंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी दिलेल्या अंसवेदनशील विधानावर चांगलेच संतापले. ते म्हणाले, "राज्यमंत्री योगेश कदम यांनी असंवेदनशील प्रतिक्रिया दिली आहे. ती दुर्दैवी आहे. सामान्य माणूस शोक, दिलगिरी व्यक्त करतो. परंतु मंत्रिपदावरील लोक असे विधानं करतात, त्यातून बळ पोलिस खात्यालाही मिळते अन् आरोपीला देखील मिळते".
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) राज्याचे म्हणून प्रमुख कारभार पाहतात. त्यांच्या कार्यपद्धतीला प्रकाश आंबेडकर यांनी लक्ष करताना, असे असंवेदशील मंत्री आहे, त्यांना मंत्रिमंडळात का ठेवावं? हा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःला विचारला पाहिजे. राज्य सरकार लोकांना दिलासा, त्याचबरोबर सुरक्षितेता देणारे असावे, असा टोला लगावला.
'मद्रास उच्च न्यायालयाने बाबरी मशिदीची दंगल, शीखांची दंगल झाली, त्यावेळी सरकारला सर्वसामान्यांचे जे नुकसान झाले, त्याची भरपाई द्यावी, असा आदेश दिला होता. संवेदनशीलता सरकारमध्ये यावे, असा त्यामागील उद्देश होता. मात्र इथं मंत्र्यांमध्ये असंवेदनशीलता दिसते, म्हणून यांना मंत्रिमंडळात का ठेवावं? वंचित बहुजन आघाडी यावर मागणी करते की, अशा मंत्र्यांना कॅबिनेटमधून काढून टाकावं. राज्य मंत्रिमंडळातून काढून टाकावं', अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.
'पोलिसांना एक आरोपी पकडण्यासाठी श्वान पथकाची गरज लागते, शंभर पोलिस लागतात आणि त्यात अनेक अधिकारी कार्यरत होते, अशी परिस्थिती होती. यावरून एकच स्पष्ट होते की, पोलिस खाते कायदा-सुव्यवस्था संभाळण्याव्यतिरीक्त अजून काय-काय करते, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज आहे हे मी मानतो', असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.