Pune Swaragate rape case : अजितदादा राजकीय वाचाळांवर अन् मीडियावर भडकले; म्हणाले, 'घटनेचं गांभीर्य बघा, तारतम्य...'

DCM Ajit Pawar political reactions media coverage Pune swargate : पुणे स्वारगेट बसस्थानकात युवतीवरील अत्याचारप्रकरणात राजकीय नेत्यांनी केलेल्या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली नाराजी.
DCM Ajit Pawar
DCM Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar statement : पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात युवतीवरील अत्याचारप्रकरणी शिरूरमधील दत्तात्रय गाडे याला पोलिसांनी अटक केली. अशा संवेदनशील घटनेवर गृहराज्यमंत्री योगेश कदम, मंत्री संजय सावकरे यांनी बेजबाबदार पद्धतीने दिलेल्या प्रतिक्रियेवरून राज्यात चांगलाच गदारोळ माजला.

विरोधक सत्ताधाऱ्यांच्या या बेजबाबदारपणावर टीकेची झोड उठवली. यातच इलेक्ट्राॅनिक्स माध्यमांनी वार्तांकनात उतावळेपणा दाखवला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सर्व प्रकारावर जाहीरपणे निरीक्षण नोंदवताना चांगलेच भडकले.

पुणे (PUNE) स्वारगेट बसस्थानकातील युवतीवरील अत्याचारातील संशयित आरोपी दत्तात्रय गाडे याच्या पोलिसांनी काल मध्यरात्री मुसक्या आवळल्या. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. या घटनेचा त्यांनी निषेध नोंदवला. आरोपीला अटक झाली पाहिजे यासाठी आम्ही प्राधान्य दिले होते, असे अजित पवार यांनी सांगितले.

DCM Ajit Pawar
Beed Santosh Deshmukh Murder Case : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळांनी घेतली मोठी भूमिका; बीडमध्ये ठोकणार मुक्काम!

अजित पवार (Ajit Pawar) यांनी संशयित आरोपी दत्तात्रय गाडे याला मध्यरात्री एक वाजता अटक केली. चौकशी केल्यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर केले जाईल, असे सांगताना राजकीय नेत्यांनी अशा संवेदनशील घटनेत दाखवलेल्या बेजबाबदारपणावर आणि माध्यमांनी बातम्या देण्याच्या अति उतावळेपणावर बोट ठेवले.

DCM Ajit Pawar
Badrinath Glacier Collapse : बद्रीनाथमध्ये तुफान बर्फवृष्टी, हिमकडा तुटला; 57 मजूर बर्फाखाली गाडले गेले

अजित पवार यांनी माध्यमांना तुम्ही कारण नसताना कुठल्याही गोष्टीचा… एखादी घटना घडल्यावर मीडियाने कशापद्धतीने मांडावी हा मीडियाचा अधिकार आहे. मी सकाळी पोलिस आयुक्तांशी बोललो. त्याला मध्यरात्री एक वाजता ताब्यात घेतले गेले. चौकशी सुरू असताना मीडिया हा इकडे गेला, तिकडे गेला, अशा बातम्या चालवल्या गेल्यावरून नाराजी व्यक्त केली.

माध्यमांचे कान टोचले...

तसेच आरोपी पकडण्यासाठी वेगळ्या बातम्या देताना, अमूक राज्यात अमूक व्यक्ती गेली, राज्यात गेली, जिल्ह्यात गेली… थोडं तारतम्य ठेवलं पाहिजे, दोषीला पकडण्यासाठी बातम्यांचा उपयोग झाला पाहिजे, त्याला स्वतःला लपवण्यासाठी होता कामा नये, असेही अजित पवार यांनी म्हटले.

राजकीय लोकांना फटकारलं...

या घटनेत राजकीय नेत्यांना देखील बेजबाबदारपणा समोर आला. विशेष म्हणजे मंत्रि‍पदावर बसलेल्या लोकप्रतिनिधींनी या घटनेवर संताप येईल, अशी विधानं केली. यावर देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. आम्हीही राजकीय लोकांनी तारतम्य ठेवलं पाहिजे, असे म्हणत अजित पवार यांनी फटकारलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com