Pune News : ट्रॅफिक कंट्रोल करताना अचानक खाली कोसळले, कात्रजमध्ये ड्युटीवर असतानाच वाहतूक पोलिसाने घेतला अखेरचा श्वास

Pune traffic police death : धनंजय वणवे हे पुरंदर तालुक्यातील तोंडल गावचे रहिवासी होते. त्यांच्या निधनाने पुणे वाहतूक पोलिस विभागावर शोककळा पसरली आहे. शिवाय कर्तव्य करत असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
Traffic police constable Dhananjay Vanave
Traffic police constable Dhananjay Vanave tragically passed away while regulating traffic near Gandharva Lawns, Katraj, PuneSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 10 Jul : कात्रज येथील गंधर्व लॉन्स परिसरात वाहतूक नियमन करत असतानाच एका वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

धनंजय वणवे (42) असं मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास धनंजय वणवे हे गंधर्व लॉन्स परिसरात वाहतूक नियमन करत असताना अचानक खाली कोसळले.

Traffic police constable Dhananjay Vanave
Pune Prostitution Racket : धक्कादायक! पुण्यातील उच्चभ्रू भागात आंतरराष्ट्रीय वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; 10 परदेशी तरुणींची सुटका

ते खाली पडल्याचं दिसताच त्यांना तातडीने कात्रज चौकातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. वणवे यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मात्र, त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे मृत्यू झाल्याचा डॉक्टरांचा अंदाज आहे. दरम्यान, त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

Traffic police constable Dhananjay Vanave
Mohan Bhagwat : "पंच्याहत्तरीची शाल अंगावर पडते तेव्हा..." : मोहन भागवत यांचं सूचक विधान; PM मोदींना थांबण्याचा सल्ला?

धनंजय वणवे हे पुरंदर तालुक्यातील तोंडल गावचे रहिवासी होते. त्यांच्या निधनाने पुणे वाहतूक पोलिस विभागावर शोककळा पसरली आहे. शिवाय कर्तव्य करत असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com