Fee Refund: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! परीक्षा फी होणार रिफंड; पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय

Drought Maharashtra Students Fee Refund : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षण विभागाने परीक्षा शुल्क माफ करण्याचे आदेश सर्व सार्वजनिक विद्यापीठांना दिले आहेत.
Savitribai Phule Pune University
Savitribai Phule Pune University
Published on: 
Updated on: 

Drought Maharashtra Students Fee Refund : शासनानं जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांनी जर महाविद्यालयांमध्ये यापूर्वीच परीक्षा शुल्क आणि अन्य शुल्क भरले असेल तर अशा विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे शुल्क प्रतिपूर्ती (रिफंड) करण्यात येणार आहे. त्यासाठी अशा विद्यार्थ्यांची माहिती देण्याची सूचना विद्यापीठाने परिपत्रकाद्वारे महाविद्यालयांना केल्या आहेत.

परीक्षा माफीचे आदेश

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षण विभागाने परीक्षा शुल्क माफ करण्याचे आदेश सर्व सार्वजनिक विद्यापीठांना दिले आहेत. मात्र, विद्यापीठाची परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया १२ सप्टेंबरपासून सुरू झाली. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी हे जाहीर होण्यापूर्वीच परीक्षा शुल्क भरले आहे. अशा विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी मिळणार का? असा प्रश्न उपस्थित होता हाता. या पार्श्वभूमीवर, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. राजेंद्र तलवारे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर तातडीने विद्यापीठाने शुल्क प्रतिपूर्तीबाबतचा निर्णय घेत त्यासंदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.

Savitribai Phule Pune University
Aaple Sarkar: महत्वाच्या दाखल्यांची काम खोळंबणार! 'आपले सरकार', डीबीटी पोर्टल अन् सरकारी ऑनलाईन सेवा 5 दिवस राहणार बंद

विद्यापीठाचं स्पष्टीकरण

राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार, परीक्षा शुल्काबाबत आवश्यक ती कार्यवाही होण्यासाठी दुष्काळग्रस्त तालुक्यांतील पात्र विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क, इतर शुल्क आकारण्यात येऊ नये. महाविद्यालयांनी परीक्षा शुल्क इनवर्ड करताना संबंधित विद्यार्थी दुष्काळग्रस्त असल्याची नोंद केल्यावर विद्यार्थ्यांचे परीक्षा आणि इतर आनुषंगिक शुल्क शून्य होईल, असे विद्यापीठाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

वेबसाईटवर माहिती करावी लागणार अपडेट

यापूर्वीच परीक्षा शुल्क आणि इतर शुल्क भरलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क आणि इतर शुल्क परत देण्यात येणार आहे. त्यासाठी महाविद्यालयांनी https://examinward.unipune.ac.in/ या लिंकवर तत्काळ माहिती सादर करावी, अशी सूचना विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. राजेंद्र तलवारे यांनी दिली आहे.

Savitribai Phule Pune University
Sunil Tatkare : शेतकऱ्यांच्या अग्रीम मदतीवरून महायुतीतही नाराजी? सुनील तटकरे मुख्यमंत्र्यांना भेटणार...

63 हजार विद्यार्थ्यांना मिळणार लाभ

आतापर्यंत दुष्काळग्रस्त तालुक्यातील सुमारे ६३ हजार विद्यार्थ्यांना विद्यापीठाने परीक्षा शुल्कमाफी लागू केली आहे. परीक्षा शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांना रिफंड करण्यात येणार आहे. या रिफंडची प्रक्रिया तातडीने पूर्ण केली जाईल, असेही विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com