Pune University : विद्यापीठ अधिसभा प्राचार्य गटाच्या निवडीत पुणे, नाशिकचा वरचष्मा!

Pune University : विद्यापीठाच्या वतीने घोषणा करण्यात आली आहे.
Pune University
Pune UniversitySarkarnama
Published on
Updated on

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची नुकतीच सिनेट निवडणूक (Pune University cinet Election) पार पडली होती. यामध्ये भाजप पुरस्कृत पॅनेल विद्यापीठ विकास मंचाने बाजी मारली होती तर महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनेलचा सपशेल पराभव झाला होता. यानंतर आता विद्यापीठ अधिसभेसाठी प्राचार्य गटातील अधिसभेसाठी निवड जाहीर करण्यात आली आहे.

Pune University
Kokan Politics : भाजपात या अन्यथा...; नितेश राणेंची ठाकरे गटाच्या नगराध्यक्षाला धमकी

रविवारी (ता.२७) रोजी प्राचार्य गटासाठीसुद्धा खुल्या गटासाठी निवडणूक पार पडली. यातून निवडून आलेल्या उमेदवारांची घोषणा विद्यापीठाने केली आहे. एकूण नऊ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. प्राचार्य गटाच्या मतदारसंघातून अनुसूचित जाती, विमुक्त किंवा भटक्या जमाती, इतर मागास वर्ग आणि महिला गटात बिनविरोध निवड झाली असून, खुल्यागटातील पाच जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली.

मतमोजणीनंतर सांगवीतील बाबुरावजी घोलप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन लक्ष्मण घोरपडे, शिवाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालयाचे डॉ. राजेंद्र शंकर झुंजारराव, नाशिकच्या महात्मा गांधी विद्यामंदिर फार्मसी कॉलेजचे डॉ. राजेंद्र सुधाकर भांबरे, राहत्यातील प्रवरा महाविद्यालयाचे डॉ. प्रदीप मच्छिंद्र दिघे आणि नाशिक जिल्ह्यातील ओझरचे आर्ट्स, सायन्स अॅन्ड कॉमर्स कॉलेजचे डॉ. संपत सहादराव काळे निवडून आले आहेत.

Pune University
Co-operative Societies Election : सहकारी संस्थांच्या निवडणुका 'या' कारणामुळे पुढे गेल्या ; सरकारचं स्पष्टीकरण

अनुसूचित जाती प्रवर्गात डॉ. देविदास भीमराव वायदंडे, विमुक्त जाती किंवा भटक्या जमाती प्रवर्गात नाशिकच्याच मातोश्री अभियांत्रिकीचे डॉ. गजानन काशिराम खराटे, इतर मागास प्रवर्गात रसिकलाल एम.धारीवाल सिंहगड इन्सिट्यूट कॅम्पसचे डॉ. वैभव विठ्ठलराव दिक्षीत आणि महिला गटात डेक्कन जिमखानाच्या शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयाच्या डॉ. क्रांती देशमुख यांची निवड झाली आहे.

या गटावर पुणे आणि नाशिकच्या उमेदवारांची निवड झाल्याने सिनेटवर या दोन जिल्ह्याचा वरचष्मा राहिल्याची चर्चा आहे. बहुतांशी पुणे, नाशिकचे उमेदवारांची प्राचार्य गटाच्या सिनेटवर झालेली दिसून येते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com