Kokan Politics : सिंधुदुर्गातील देवगडच्या ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या नगराध्यक्षा साक्षी प्रभु यांनी भाजप (BJP) आमदार नितेश राणे यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. २५ लाख आणि भाजपात प्रवेश करण्यासाठी नितेश राणे यांनी आपल्याला ऑफर दिल्याचे प्रभु यांनी म्हटले आहे. तसेच भाजपात प्रवेश न केल्यास बदनामी करण्याची धमकी दिल्याचे साक्षी प्रभु यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
भाजप आमदार नितेश राणे यांनी आपल्याला फोनवरुन २५ लाख रुपये घ्या आणि भाजपात या अशी ऑफर दिली. इतकेच नव्हे तर भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी सातत्याने त्यांच्याकडून दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोपही प्रभु यांनी केला आहे. याबाबत त्यांनी देवगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. भाजपकडून सुरुवातीला नगराध्यक्षपद दिल जाईल, नंतर नगराध्यक्षपद सोडावं लागेल,अशी धमकी राणे यांनी दिली असल्याचे साक्षी प्रभु यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटलं आहे. तसेच, भाजपमध्ये प्रवेश न केल्यास तुम्हाला खोट्या केसेसमध्ये अडकवू आणि बदनामी करु, अशीही धमकी राणेंनी दिली आहे. नितेश राणेंकडून जिवाला धोका असून आपलं काही बरवाईट झाल्यास त्याला नितेश राणे जबाबदार असतील, अस साक्षी प्रभु यांनी म्हटलं आहे.
साक्षी प्रभु या शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या देवगडच्या नगराध्यक्षा आहेत. नितेश राणे, प्रणाली माने आणि मिलींद माने यांनी ही धमकी दिली आहे. प्रणाली माने या आपल्या घरी आल्या आणि त्यांनी त्यांच्या फोनवरुन नितेश राणेंना फोन लावला. नितेश राणेंनी २५ लाख रुपये घ्या आणि भाजपात प्रवेश करा अशी ऑफर दिली. सुरुवातीला नगराध्यक्षपद देऊ, नंतर पद सोडावं लागेल असंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे आपल्यावर खुप दबाव असल्याचा दावाही साक्षी प्रभु यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.