Pune University : पुणे विद्यापीठातील राडा पूर्वनियोजित ? धागेदोरे पुण्यासह नगर-नाशिकपर्यंत ?

Pune Politics : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संघटनांमध्ये दोन दिवसांपूर्वी हाणामारी झाली होती.
Pune University Student Controversy
Pune University Student Controversy Sarkarnama
Published on
Updated on

Nagar Political News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थी संघटनांमध्ये झालेला राडा हा पूर्वनियोजित असल्याची माहिती समोर येत आहे. आंदोलनाच्या नावाखाली संघटनांनी पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना एकत्र आणल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी 'फंडिंग' झाल्याची चर्चा असून, या राड्याबाबत सखोल चौकशीची गरज व्यक्त केली जाऊ लागली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संघटनांमध्ये दोन दिवसांपूर्वी हाणामारी झाली होती. यानंतर दोन्ही संघटनांमध्ये तणाव होता. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी विद्यापीठाच्या वसतिगृहातील भिंतीवर आक्षेपार्ह मजकूर लिहिण्याचा प्रकार झाला. यातून पुणे विद्यापीठात विद्यार्थी संघटनांमधील वातावरण अधिकच खराब झाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Pune University Student Controversy
Pune University Student Controversy : पुणे विद्यापीठात भाजप अन् डाव्या विद्यार्थी संघटनांमध्ये तुफान राडा; पोलिसांनी वातावरण...

या प्रकरणी पुणे विद्यापीठाचे डॉ. महेश दवंगे यांच्या तक्रारीवरून चतुःशृंगी पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुणे विद्यापीठातील वातावरण बिघडण्याचे काम काहींकडून केले जात असल्याची आता चर्चा सुरू झाली आहे. पुणे विद्यापीठातील राड्यामागे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील पुणे, नगर आणि नाशिक या जिल्ह्यांतील महाविद्यालयातून विद्यार्थ्यांची फळी उभी करण्यात आल्याची चर्चा आहे. त्याचे धागेदोरे नगरच्या काही महाविद्यालयांच्या वसतिगृहापर्यंत येत आहेत.

संघटनांनी या विद्यार्थ्यांना पुणे विद्यापीठात आंदोलन करायचे आहे, असे सांगून नगरमधील काही महाविद्यालयांच्या वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांशी गेल्या 15 दिवसांपासून संपर्क साधत होते. यासाठी पत्रकेदेखील वाटली होती. परंतु आंदोलनाची रूपरेषा सांगितली जात नव्हती. या विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यासाठी प्रवास आणि खाण्यापिण्याची सर्व भत्त्याची सोय असल्याचेही सांगितले गेले होते. यानुसार काही विद्यार्थी पुणे विद्यापीठात जाण्यास तयार झाले. तसे हे विद्यार्थी विद्यापीठात गेले आणि तिथे झालेल्या आंदोलनातही सहभागी झाले.

पुणे विद्यापीठ्यातील राड्यानंतर नगरच्या महाविद्यालयांमधील हे विद्यार्थी पुन्हा काल वसतिगृहात दाखल झाले. यात काही विद्यार्थी जखमी असल्याचीही खात्रिलायक माहिती आहे, तर जखमी झालेले अनेक विद्यार्थ्यांनी दिवाळीच्या सुट्ट्यांच्या नावाखाली घर गाठले आहे. काही विद्यार्थी अजूनही महाविद्यालयांच्या आवारात असून, पुणे विद्यापीठातील किस्से सहकारी मित्रांना रंगून सांगत आहेत.

पोलिसांकडून तपास सुरू

पुणे विद्यापीठातील आवारातील मुलांचे वसतिगृह क्रमांक आठमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर लिहिण्याचा प्रकार गुरुवारी (ता. 2) उघडकीस आला. यासंदर्भात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा शोध सुरू केला आहे. विद्यापीठातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील चित्रीकरण तपासले जात आहेत. पुणे विद्यापीठात राडा होण्यापूर्वी कोणत्या विद्यार्थी संघटनांना पक्षीय बळ मिळाले होते का, याचीहीदेखील चौकशी होणे गरजेचे आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com