Pune Vidhansabha Election 2024 : पुण्यात चार मतदारसंघात उमेदवार फिक्स; कसबा अन् कॅन्टोन्मेंटमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच

Pune vidhan sabha Election 2024 : उमेदवार निवडीसाठी वेगळी प्रक्रिया अवलंबून असून मतदारसंघातील पदाधिकार्‍यांचं मतदान घेऊन उमेदवार निवडण्यात येत आहे. आज ही प्रक्रिया पुण्यात पार पडली.
pune Vidhansabha Electon 2024
pune Vidhansabha Electon 2024Sarlkarnama
Published on
Updated on

Pune News : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. या राजकीय पक्षांकडून महाराष्ट्रातील सर्व विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात येत आहे. त्यानुसार पक्षाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्यांची मतदारसंघ निहाय चाचपणी करण्यात येत आहे. यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले होते. भाजपने मात्र उमेदवार निवडीसाठी वेगळी प्रक्रिया अवलंबून असून मतदार संघातील पदाधिकार्‍यांचं मतदान घेऊन उमेदवार निवडण्यात येत आहे. आज ही प्रक्रिया पुण्यात पार पडली.

भाजपच्या या मतदान प्रक्रियेमध्ये कोथरूड ,पर्वती शिवाजीनगर आणि खडकवासल्यामध्ये विद्यमान आमदारांना पसंती देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सोबतच बहुचर्चित अशा कसबा विधानसभा मतदारसंघांमध्ये धीरज घाटे (Dhiraj Ghate) , हेमंत रासने आणि कुणाल टिळक यांची नावे आघाडीवरती असून यातीलच एक नाव उमेदवार म्हणून भाजप पुढे करेल असं देखील बोलले जात आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Election) कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात भाजपची पिछेहाट झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे या मतदारसंघातून उमेदवार बदलण्यात येणार का? याबाबत चर्चा सुरू आहे. असं असताना देखील कॅन्टोन्मेंट मतदारसंघात विद्यमान सुनील कांबळे आणि त्यांचे बंधू दिलीप कांबळे यांच्या नावाची चर्चा असल्याचं पाहायला मिळाले.

pune Vidhansabha Electon 2024
MLA Rohit Pawar: हिंदू मतांना आकर्षित करण्यासाठी 'हा' निर्णय; रोहित पवारांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं

आज झालेल्या मतदान प्रक्रियेमध्ये वडगाव शेरी (Wadgaon Sheri) हडपसर मतदारसंघाचा विचार करण्यात आला नव्हता दुसऱ्या टप्प्यामध्ये या मतदारसंघांसाठी मतदान होणार असल्याचं सांगण्यात येत आहे

कशी होती मतदान प्रक्रिया?

आज राबवण्यात आलेल्या मतदान प्रक्रियात केंद्र, प्रदेश, शहर आणि विधानसभा स्तरावरील पदाधिकारी असे मिळून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 60 ते 70 जणांना आपल्या पसंतीच्या तीन उमेदवारांना मते देण्यास सांगण्यात आले. त्यानुसार पदाधिकाऱ्यांनी आपली मत केंद्रातून आलेल्या निरीक्षकाकडे मांडली आहे.

pune Vidhansabha Electon 2024
MLA Rohit Pawar: हिंदू मतांना आकर्षित करण्यासाठी 'हा' निर्णय; रोहित पवारांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं

आता ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केंद्रातून आलेले निरीक्षक पसंती क्रमानुसार तीन नावे प्रदेश भाजपाला पाठवतील. नंतर भाजपा (BJP) प्रदेश कोण ही नावे पुढे केंद्र स्तरावर पाठवण्यात येतील. त्यानंतर वरिष्ठांकडे पाठवण्यात आलेली नाव आणि पक्षाच्या पातळीवर करण्यात आलेले सर्वेक्षण यांच्या आधारावर ज्याची निवडणूक जिंकण्याची जास्त क्षमता असेल त्यालाच तिकीट जाहीर करण्यात येईल असं भाजपाच्या सूत्रांकडून सांगण्यात आल आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com