Radhakrishna Vikhe Patil News : जरांगे, आता प्रतिष्ठा पणाला लावू नका, उपोषण थांबवायला हवं; विखे पाटील म्हणाले, 'सरकारला संधी द्या...'

Maratha reservation : काही मंडळींकडून आरक्षण हा प्रश्न विनाकारण प्रतिष्ठेचा बनवला जात आहे.
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe PatilSarkarnama

Pune : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू आहे. उपोषणाचा आज १४वा दिवस आहे. कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने जरांगेंनी आपण उपोषण मागे घेणार नसल्याचे सांगितले आहे. यात आता त्यांनी पाणी आणि औषधांचाही त्याग केला आहे. भाजपचे नेते, मंत्री राधाकृष्ण पाटील यांनी जरांगेंना आता उपोषण मागे घ्यावे, असे सुचवले आहे.

"काही मंडळींकडून आरक्षण हा प्रश्न विनाकारण प्रतिष्ठेचा बनवला जात आहे. मागच्या सरकारने सर्वोच्च न्यायालयापर्यंत आरक्षण टिकवले होते. दुर्दैवाने आघाडी सरकार यात कमी पडले. याचे परिणाम राज्याला भोगावे लागत आहेत. आता आम्ही कुणबी दाखले देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जरांगेंनी आता प्रतिष्ठा पणाला लावू नये, त्यांनी थांबायला हवं. सरकारला संधी द्यावी," असे विखे पाटील म्हणाले.

सरसकट आरक्षणाच्या आपल्या निर्णयावर मनोज जरांगे ठाम आहेत. राज्य सरकारच्या वतीने सातत्याने जरांगे यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. मनोज जरांगेंनी पाणी आणि औषधांचाही त्याग केला आहे. त्यांनी सलाइनही काढले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली आहे. त्यामुळे आरक्षणाचा पेच सुटणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Radhakrishna Vikhe Patil
Satara Pusesavali News: पुसेसावळीत आक्षेपार्ह पोस्टवरून दोन गट भिडले; दगडफेक अन् जाळपोळ

एक सप्टेंबरला या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने आंदोलनाची चर्चा राज्यभर झाली होती. त्यात आता आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे जरांगे यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी राज्य शासनाने आतापर्यंत तीन वेळा चर्चा केली आहे. मात्र, त्यातून कोणताच तोडगा निघालेला नाही. राज्य सरकारने दोन अध्यादेशदेखील काढले आहेत. तरीदेखील मनोज जरांगे सरसकट आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com