Pune News : सत्तेत आल्यानंतर आर्थिक सर्व्हे करून मागास असलेल्याची संख्या किती आहे, याचा अंदाज घेण्यात येईल. त्यासोबतच येत्या काळात जातीय जनगणना करून आरक्षणाची मर्यादा वाढविणार असल्याची मोठी घोषणा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली.
पुण्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindar dhngekar) यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेप्रसंगी ते बोलत होते. (Rahul Gandhi News)
एकीकडे इंडिया आघाडी संविधान वाचविण्याचे काम करत आहे. तर दुसरीकडे भाजपच्या नेत्याकडून वारंवार संविधान बदलण्याची भाषा केली जात आहे. भाजप संविधान संपविण्याचे काम करत आहे, असा आरोप काँग्रेसचे (Congress ) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला.
मी जेव्हापासून जातनिहाय जनगणनेची मागणी करू लागलो. तेव्हापासून मोदी म्हणू लागले की या देशात दोनच जाती आहेत एक श्रीमंत आणि एक गरीब. अचानक ते ओबीसी असल्याचा दावा करत आहेत. कॉंग्रेस सत्तेत आल्यावर आरक्षणाची मर्यादा आम्ही उठवू... ज्यामुळे मराठा आणि धनगरांना आरक्षणात वाटा मिळेल,असेही राहुल गांधी म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कॉंग्रेस सत्तेत आल्यावर भारतातील गरीबांची यादी आम्ही तयार करु. त्या महिलेच्या अकांटमधे आम्ही वर्षाला एक लाख रुपये जमा करू. त्यासोबतच कॉंग्रेस सत्तेत आल्यावर अग्नीवीर योजना रद्द करू, शेतकरी वर्गासाठी कर्ज माफी कमिशन तयार करू, असेही यावेळी राहुल गांधी म्हणाले.