Pune Accident News: पुणे 'हिट अँण्ड रन' प्रकरणात राहुल गांधींचा गैरसमज ? असीम सरोदेंचे नेमकं म्हणणं काय ?

Pune Porsche Accident News: श्रीमंतांना वेगळा आणि गरिबांना वेगळा न्याय आहे का? असा देखील सवाल त्यांनी सरकारला विचारला होता. या निर्णयावर आता पुण्यातील ऍड. असीम सरोदे यांनी राहुल गांधींचा गैरसमज झाला असल्याचे वक्तव्य केला आहे.
Asim Sarode, Rahul Gandhi
Asim Sarode, Rahul Gandhi Sarkaranma

Pune News : पुण्यातील 'हिट अँण्ड रन' प्रकरणात दखल घेत काँग्रेसच्या वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी एक्स या प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ प्रदर्शित करून बाल हक्क न्यायालयाने दिलेल्या निर्णयाबाबत आश्चर्य व्यक्त केले होते. श्रीमंतांना वेगळा आणि गरिबांना वेगळा न्याय आहे का? असा देखील सवाल त्यांनी सरकारला विचारला होता. या निर्णयावर आता पुण्यातील ऍड. असीम सरोदे यांनी राहुल गांधींचा गैरसमज झाला असल्याचे वक्तव्य केला आहे.

पुणे पोलिसांनी बुधवारी विशाल अगरवाल (Vishal Agrwal) याला पुणे कोर्टामध्ये हजर करत सात दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र, कोर्टाने तीन दिवसांची पोलीस कोठडी आरोपींना सुनावली आहे. दरम्यान या प्रकारांमध्ये असीम सरोदे (Aseem Sarode) यांनी देखील हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे.

Asim Sarode, Rahul Gandhi
Lok Sabha Election News : देशभरात भाजपला किती जागा मिळणार; अखिलेश यादव, केजरीवाल, खर्गेंनी सांगितला थेट आकडाच !

याबाबत माहिती देताना सरोदे म्हणाले, विशाल अगरवाल यांच्या वकिलांनी ज्या कारणांसाठी जामीन मागितला होता ती कारणे सध्या लक्षात घेण्यात येऊ शकत नाहीत, असे न्यायालयाने सांगितले आहे. आपल्या मुलाचं वय 18 वर्षापेक्षा कमी असताना रजिस्ट्रेशन नसलेली गाडी त्याला चालवण्यासाठी त्यांनी दिले असून त्यांनी आपली वडिलांची भूमिका पार पडली नसल्याचे मत कोर्टाने व्यक्त केलं असल्याचं सरोदे यांनी सांगितलं.

आपलं मुलाचं वय 18 वर्षे पूर्ण नसल्याचे माहित असताना देखील त्याला पबमध्ये जाऊन देणं हे चांगल्या वडिलांचे लक्षण नाही. त्यामुळे बाल हक्क कायद्यानुसार त्यांनी आपल्या मुलाकडे दुर्लक्ष केलं आहे. त्याचाच परिणाम म्हणून हा अपघात झाला असून त्यांनी मुलाला जास्तीची मोकळीक दिली आहे. त्यामुळे न्यायालयाने आरोपींना ३ दिवसाची कोठडी देण्यात आली आहे.

असीम सरोदे म्हणाले, या प्रकरणांमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह सर्वांचाच गैरसमज झाला आहे. या अल्पवयीन आरोपीला जामीन मिळाला म्हणजे त्याला मोकळा सोडून दिलाय असे नाही. आरोपीचा जामीन होत असताना बाल हक्क कायद्यानुसार त्याल देण्यात येणारी शिक्षा अथवा अटी ही सुधारणावादी असते. त्याला काही अटींवरती जामीन मिळाला याचा अर्थ सगळ्यांना सोडण्यात येईल, असे नाही.

राहुल गांधी यांचा जो काही समज झालेला आहे तो भावनाशील समज आहे. राहुल गांधी यांनी जो व्हिडिओ बनवलेला आहे. त्यातून त्यांचा आरोपीला सोडून दिलाय, असा समज झाल्याचे दिसत असल्याचे असीम सरोदे यांनी सांगितले.

(Edited By : Sachin Waghmare)

Asim Sarode, Rahul Gandhi
Rahul Gandhi News : बालेकिल्ल्यातच राहुल गांधींवर नाराजी, 'जय श्रीराम'च्या घोषणेनंतर हात जोडून फिरले माघारी

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com