Lok Sabha Election News : देशभरात भाजपला किती जागा मिळणार? अखिलेश यादव, केजरीवाल, खर्गेंनी सांगितला थेट आकडाच !

Political News : पाचव्या टप्प्यात देशातील लोकसभेच्या 543 जागांपैकी 429 म्हणजे जवळपास 80 टक्के मतदार संघातील मतदान आता पार पडले आहे.
Mallikarjun kharge, Arvaind kejrival, Akhilesh yadav
Mallikarjun kharge, kejrival, akhilesh yadav Sarkarnnama
Published on
Updated on

Election News : लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान नुकतेच पार पडले. देशातील आठ राज्यातील 49 मतदारसंघात सरासरी 60 टक्के मतदान झाले. पाचव्या टप्प्यात देशातील लोकसभेच्या 543 जागांपैकी 429 म्हणजे जवळपास 80 टक्के मतदार संघातील मतदान आता पार पडले आहे. उर्वरित दोन टप्प्यांमध्ये केवळ 124 मतदारसंघ शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

पहिल्या पाच टप्प्यातील आकडेवारी पाहता कमी मतदान झाले आहे. त्यामुळे हा घटलेला टक्का कोणाच्या मदतीला येणार व कोणाच्या पथ्यावर पडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यातच आता या निवडणुकीत भाजपला किती जागा मिळू शकतात याचा अंदाज सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav), दिल्लीचे मुख्यमंत्री अरविद केजरीवाल (Arvind Kejriwal), काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun kharge) यांनी भाजपला देशभरात किती जागा मिळणार याचा, अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे येत्या काळात भाजपच्या चिंतेत वाढ होणार आहे.

Mallikarjun kharge, Arvaind kejrival, Akhilesh yadav
Ambadas Danve News : मुंबईतील कमी मतदानाला कोण जबाबदार? दानवेंचा आयोगावर ठपका!

लोकसभा निवडणुकीत पाच टप्प्यात झालेल्या मतदानानुसार सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले, भाजपने आतापर्यंत 400 पेक्षा जास्त जिंकण्याच्या घोषणा दिल्या आहेत. त्यांना आता पुन्हा अशा घोषणा देता येणार नाहीत. देशातील एकूण जागांपैकी भाजप फक्त 143 जागा जिंकत आहेत. कदाचित हे देखील खूप आहे. जनता त्यांना 140 जागांपेक्षा अधिक जागी निवडून देणार नाही.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, भाजपकडून देशभरात 400 च्या जागा जिंकण्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे आता हे त्यांना शक्य नाही, असे झाले तर काहीतरी गडबड आहे. त्यांना 200 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत. यापेक्षा जास्त जागा आल्या तर समजून घ्या की ते काहीतरी चुकीचे करत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अंतरिम जामिनावर बाहेर असलेले मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले, तीन महिन्यांपूर्वी त्यांना फक्त 400 च्या वर जागा मिळतील असे वाटत होते. अचानक तीन महिन्यात इतकी मोठी घट झाली आहे. त्यामुळे देशात 400 जागा येतील की नाही याची शाश्वती नाही. 250 जागा मिळणार की नाही यावर पैजा सुरू आहेत. त्यामुळे हा एक चमत्कार असून ही देवाची कृपा आहे.

Mallikarjun kharge, Arvaind kejrival, Akhilesh yadav
Beed Loksabha Election : पंतप्रधान मोदी, उदयनराजेंनी सभा घेतलेल्या 'या' मतदार संघातून 'लीड' कोणाला मिळणार?

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com