Rahul Kalate: शरद पवारांनी आयटी पार्क आणले, पण सत्ताधाऱ्यांनी वाट लावली; राहुल कलाटेंचा घणाघात!

Rahul Kalate Criticizes Ruling Party: करदाते आयटीयन्सच्या सर्व समस्या सोडविण्याचे राहुल कलाटेंचे आश्वासन
Rahul Kalate
Rahul KalateSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Vidhansabha Election: आमचे दूरदृष्टी नेतृत्व शरदचंद्र पवार यांनी जागतिक दर्जाचे आयटी हब येथे आणले. त्यामुळे शहराचा कायापालट झाला. मात्र, गेल्या काही वर्षांपासून सत्ताधाऱ्यांनी नाकर्तेपणामुळे आयटीची वाट लावली. करदाते आयटीयन्स विविध समस्यांच्या गर्तेत अडकले आहेत. यातून महाविकास आघाडीच सर्वांची सुटका करणार असल्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांनी नागरिकांना आश्वासन दिले.

अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सेक्रेटरी पृथ्वीराज साठे मित्र परिवाच्या वतीने चिंचवड विधानसभा मतदार संघातील मित्र परिवारासाठी काळेवाडी येथील इंदू लॉन्समध्ये दिवाळी फराळ स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी संवाद साधताना कलाटे बोलत होते. या मेळाव्याला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक मोरे, अभिमन्यू दहीतुले, बाबू नायर, सजी वर्की व शाम अगरवाल, मनोज कांबळे, कौस्तुभ नवले, सौरभ शिंदे, स्वप्निल बनसोडे, सायली नढे, नरेंद्र बनसोडे, राहुल ढाले, वीरेंद्र गायकवाड, शंकर ढोरे, अमित जगदाळे, शयान अन्सारी, तेजस पाटील, बाबा गायसमुद्रे, स्वाती शिंदे, समिता गोरे, अशोक मंगल, रोहित शेळके, जय ठोंबरे यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे, विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आयटीयन्स व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Rahul Kalate
Solapur South Constituency : महाआघाडीच्या ‘धर्मा’ला काडादी, माने जागणार? माघार घेणार की अपक्ष लढणार?

राहुल कलाटे पुढे म्हणाले, 'शरद पवारांचा आग्रह आणि पुढाकारामुळे आयटी पार्क झाले. पुणे व पिंपरी चिंचवड शहरासह देशातील लाखो तरुणांना रोजगार प्राप्त झाले. लाखो भारतीय येथे स्थायिक झाले. पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, सांगवी, रहाटणी, वाकड, थेरगाव हा परिसर म्हणजे आयटीयन्सची वसाहत झाला आहे. शासनाच्या तिजोरीत सर्वाधिक महसूल देखील यांचाच जातो.

मात्र, राज्यकर्त्यांच्या अनास्थेमुळे आयटीयन्सना आजवर केवळ मनस्तापच सहन करावा लागला आहे. अनेक आयटी कंपन्या हिंजवडीतुन काढता पाय घेत आहेत. आता कोणीही हवालदिल होऊ नये ज्याप्रमाणे शरद पवारांनी आयटी पार्क केले त्याचप्रमाणे आयटीशी निगडित सर्व समस्या सोडविण्याची जबाबदारीही आमचीच आहे.'

Rahul Kalate
Pandharpur Constituency : शरद पवार सोडवणार पंढरपूरचा तिढा; बारामतीत भालके-सावंतांना बोलावले भेटीसाठी!

महाविकास आघाडीचे हात बळकट कारण्यासाठी तुमची साथ हवी -

'सध्या आयटी व लगतच्या परिसराला गंभीर वाहतूक समस्येसह अन्य समस्यांनी ग्रासले आहे. ज्याप्रमाणे दूरदृष्टी ठेवून आयटी पार्क आणले जाऊ शकते. त्याचप्रमाणे आयटीतील व आयटीशी संबंधित सर्व समस्यातून केवळ शरद पवारच (Sharad Pawar) सुटका करू शकतात. त्यामुळे शरद पवारांचे तसेच महाविकास आघाडीचे हात बळकट कारण्यासाठी तुमची साथ हवी आहे.' असं राहुल कलाटे यांनी म्हटलं आहे.

...तर राहुल कलाटेंशिवाय पर्याय नाही -

'हाउसिंग सोसायटी फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांना गेल्या दोन-तीन निवडणुकांत विविध आश्वासने देण्यात आली. मात्र अद्याप त्याची पूर्तता झाली नाही. कोट्यावधी महसूल देऊन आमची फरफट कायम आहे. मात्र, राहूल कलाटे हे आमच्या समस्या जवळून जाणतात त्या सोडविण्याचा प्रयत्न करतात. मात्र आमच्या त्यावर कायमचा तोडगा काढायचा असेल तर राहुल कलाटेंशिवाय पर्याय नाही.' अशी प्रतिक्रिया हाउसिंग सोसायटीज फेडरेशनचे अध्यक्ष दत्तात्रेय देशमुख यांनी दिली आहे.

(Edited by -Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com