Solapur South Constituency : महाआघाडीच्या ‘धर्मा’ला काडादी, माने जागणार? माघार घेणार की अपक्ष लढणार?

Assembly Election 2024 : माजी आमदार दिलीप माने यांच्याप्रमाणेच सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी या बड्य नेत्यानेही दक्षिणमधून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे.
Amar Patil-Dilip Mane-Dharmaraj Kadadi
Amar Patil-Dilip Mane-Dharmaraj KadadiSarkarnam
Published on
Updated on

Solapur, 03 November : सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या सोलापूर दक्षिण मतदारसंघातून कोण माघार घेणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. महाविकास आघाडीतील माजी आमदार दिलीप माने, सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडदी या प्रबळ नेत्यांनी या मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे, त्यामुळे या नेत्यांची समजूत कशी काढली जाणार आणि ते माघार घेणार का, याची उत्सुकता आहे.

सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून (Solapur South Constituency) माजी आमदार दिलीप माने हे काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. लोकसभा निवडणुकीत सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून तब्बल दहा हजारांचे लीड प्रणिती शिंदे यांना मिळाले होत, त्यामुळे सोलापूर दक्षिण मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची गर्दी काँग्रेसकडे होती, त्यातूनच कोणाला उमेदवारी द्यायची, याचा पेच माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्यासमोर होता.

दरम्यान, महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सोलापूर दक्षिण मतदारसंघातून अमर पाटील यांची उमेदवारी जाहीर केली, त्यामुळे काँग्रेसमधील इच्छुकांची बेचैनी वाढली होती. विधानसभेचे उमेदवारी काँग्रेसकडून जाहीर होत नसल्याचे पाहून माजी आमदार दिलीप माने (Dilip Mane) यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जिल्ह्यातील सर्व तेरा मतदारसंघांत अपक्ष उमेदवार उभे करण्याचे आव्हान दिले होते.

Amar Patil-Dilip Mane-Dharmaraj Kadadi
Pandharpur Constituency : शरद पवार सोडवणार पंढरपूरचा तिढा; बारामतीत भालके-सावंतांना बोलावले भेटीसाठी!

काँग्रेसच्या यादीत दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर झाली खरी मात्र, त्यांना शेवटपर्यंत एबी फॉर्म पक्षाकडून मिळू शकला नाही, त्यामुळे दिलीप माने यांनी सोलापूर दक्षिणमधून अपक्ष निवडणुकीचा अर्ज भरला. मात्र, एबी फॉर्म न मिळाल्यामुळे दिलीप माने यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत काँग्रेस नेतृत्वावर आगपाखड केली. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा उद्या (सोमवार, ता. ०४ नोव्हेंबर) शेवटचा दिवस असून ते माघार घेणार की दक्षिणमधून शड्डू ठोकणार, याची उत्सुकता आहे.

माजी आमदार दिलीप माने यांच्याप्रमाणेच सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी या बड्य नेत्यानेही दक्षिणमधून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र, त्यांची अपक्ष निवडणूक लढवण्याची इच्छा नसून ते महाविकास आघाडीकडून लढण्यासाठी इच्छुक होते. मात्र, त्यांना अधिकृत उमदेवारी जाहीर न झाल्याने काडादी हे माघारी घेतात का, याची प्रतीक्षा आहे.

Amar Patil-Dilip Mane-Dharmaraj Kadadi
Pusad Constituency : महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री देणाऱ्या कुटुंबातील फूट अखेर टळली; छोट्यासाठी मोठ्या भावाची माघार!

महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी जाहीर झालेले अमर पाटील हे सिद्धेश्वर सहकारी सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत. धर्मराज काडादी यांच्या नेतृत्वाखाली ते सिद्धेश्वर कारखान्यात काम करीत आहेत, त्यामुळे काडादी हे माघार घेऊन अमर पाटील यांना पाठिंबा देऊ शकतात, अशीही चर्चा मतदारसंघात आहे. मात्र त्यांचा अधिकृत निर्णय उद्या दुपारी चारनंतर होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com