Rahul Kalate : 'हम भी है रेस में!'; अश्विनीवहिनी अन् शंकरशेठ यांना राहुल कलाटे देणार चॅलेंज...

Ashwini Jagtap, Shankarsheth Jagtap : महायुतीत आमदार अश्विनी जगताप की त्यांचे दीर शंकर जगताप यांच्यात उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू असतानाच कलाटे यांनी चिंचवडमध्ये ट्विस्ट निर्माण केला आहे.
Rahul Kalate
Rahul Kalate Sarkarnama
Published on
Updated on

Chinchwad Political News : लोकसभा संपताच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरू झाले आहे. पुण्यातील चिंचवडमध्ये महायुतीत विधानसभेवरून कलगीतुरा सुरू असतानाच महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे नेते राहुल कलाटे यांनीही उमेदवारीचा पहिला डाव टाकला आहे.

महायुतीत आमदार अश्विनी जगताप की त्यांचे दीर शंकर जगताप यांच्यात उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू असतानाच कलाटे यांनी चिंचवडमध्ये ट्विस्ट निर्माण केला आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघात लढण्यावरून भाजपच्या आमदार अश्‍विनी जगताप Ashwini Jagtap आणि त्यांचे दीर, पिंपरी चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्यात आतापासून तिकिटाची ‘रेस’ सुरू झाली आहे. पुढच्या निवडणुकीत वहिनींना घरी बसवून, विधानसभेत जाण्याची इच्छा शंकर जगतापांना लपवता आली नाही. तर ‘कोणी काहीही बोलले तरी; मीच पुन्हा आमदार होणार, त्यासाठी लढणार असल्याचे सांगून अश्‍विनीवहिनींनी शंकर जगतापांना ‘चूप’ राहण्याचा अप्रत्यक्ष सल्ला दिला.

दीर-भावजय यांच्यात वादाची चिन्हे असतानाच, जगताप घराण्याचे ‘टेन्शन’ वाढविणाऱ्या माजी नगरसेवक राहुल कलाटेंनीही Rahul Kalate आता पुन्हा जगतापांना 'चॅलेंज' करण्याचा पवित्रा घेतला आहे. म्हणजे, या निवडणुकीत काही करून जगतापांना हरवण्याची कलाटेंची खेळी आहे. त्याकरिता ते आता महाविकास आघाडीच्या तंबूत जाण्याची शक्यता आहे. पुढच्या विधानसभा निवडणुकीत कलाटे हे लढणार असून, त्यासाठी आता ते तुतारी फुंकणार की मशाल घेऊन मते मागणार, हे पाहाणे महत्त्वाचे आहे. मात्र, कलाटेंचा पवित्रा पाहाता, चिंचवडमध्ये पुन्हा जगताप आणि कलाटेंमधील धुमश्‍चक्री राहणार आहे.

Rahul Kalate
Padharpur Wari : शिंदे सरकारचा मोठा निर्णय! वारीतील प्रत्येक दिंडीला मिळणार 20 हजार रुपयांची देणगी

दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीपासून लढण्याच्या बेतात असलेल्या शंकर जगतापांना काही केल्या आमदार व्हायचेच आहे. त्यासाठी वहिनींनी किती ठामपणे सांगितले तरीही शंकर जगताप Shankar Jagtap फडणवीसांकडे ‘वशिलेबाजी’ करून तिकिट आणू शकतात. तेव्हा, अश्‍विनीवहिनी या काही सहजपणे आपले तिकिट जाऊ देणार नाहीत, असेच आताचे चित्र आहे. त्यातच महाविकास आघाडीकडून राहुल कलाटे यांनी विधानसभेसाठी दंड थोपटले आहेत. चिंचवडमधील या रेसमध्ये आता राष्ट्रवादीचे नेते नाना काटे काय करणार, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Rahul Kalate
Satara NCP SP Dispute : किल्ला गेला तरी धुसफूस कायम; साताऱ्यातील शरद पवार गटात चाललंय तरी काय?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com