Raj Thackeray
Raj Thackeray Sarkarnama

Raj Thackeray : "फडणवीस साहेब, तो मूर्खपणा मी करणार नाही!" अदानींच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा थेट निशाणा; नेमकं प्रकरण काय?

Raj Thackeray latest statement on Fadnavis : “तो मूर्खपणा मी करणार नाही” म्हणत राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर थेट हल्ला चढवला, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.
Published on

Pune News : मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर गौतम अदानी समूहाने झपाट्याने विस्तार केला आणि फक्त त्यांनाच महत्वाचे प्रकल्प व जमिनी मिळाल्या असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता, याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजी पार्कमधील महायुतीच्या सभेत प्रतिउत्तर दिले. २०१४ नंतर फक्त अदानीच नव्हे तर अनेक उद्योग समूहांचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे, त्यांचे उत्पन्न आणि वाढ दिसून येत आहे, असं सांगितलं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना राज ठाकरे यांनी उत्तर दिले आहे.

पुण्यात माध्यमांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, उद्योगपतींच्या विरोधात नाही, तर विशिष्ट पद्धतीच्या मक्तेदारीविरोधात आहे. अंबानी, टाटा, बिर्ला यांनी आपले उद्योग स्वतः उभे केले 50 ते 60 वर्षाच्या संघर्षातून झाले. पण अदानी समूहने ते फक्त 10 वर्षात असामान्य गतीने पुढे गेला. याला केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या ‘रेड कार्पेट’ धोरणामुळेच मदत मिळते आहे. सरकार एकाच उद्योगसमूहाला सगळ्या देशाची पायाभूत व्यवस्था देत आहे – हे धोकादायक आहे. त्यामुळे व्यवसायाला विरोध आहे असला मूर्खपणा माझ्या बोलण्यातून नव्हता आणि नाही अस राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray
Rashid Mamu : मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांच्या तोंडी एकच नाव संभाजीनगरचे माजी महापौर 'रशीद मामू'!

राज ठाकरे पुढे म्हणाले, देशातील अनेक विमानतळ अदानींना दिले गेले, नवी मुंबईचा विमानतळ सोडला तर एकही त्यांनी स्वतः उभा केलेला नाही. एक पोर्ट सोडून बाकी पोर्ट त्यांनी खरेदी केली. हे सर्व दबाव किंवा घाईत मिळवले गेले जणू ‘गन पॉइंटवर’. मक्तेदारी निर्माण होण्याचा धोका अधोरेखित करताना ते म्हणाले, सिमेंट उद्योगात अदानी नव्हते, पण आज मोठ्या प्रमाणावर तो व्यवसाय गिळंकृत करत आहेत. पॉवर, स्टील, सिमेंट – हे देशाच्या कणा असलेले व्यवसाय आहेत. हे सर्व जर एका समूहाच्या हातात गेले तर देश आर्थिकदृष्ट्या असुरक्षित बनेल.

हवाई वाहतूक आणि इंडिगो अनुभवाचा उल्लेख करताना राज ठाकरे म्हणाले, इंडिगोच्या संकटात आपण पाहिले – एका कंपनीवर परिणाम झाला की संपूर्ण देशाची हवाई वाहतूक ठप्प होते. असाच धोका जर अदानी साम्राज्याबाबत निर्माण झाला तर देशाचे काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Raj Thackeray
Ladki Bahin Installment : मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होण्यास सुरुवात, पण 'या' एका निर्णयामुळे बसला मोठा फटका!

शहरे, वाहतूक, वीज, बंदरे, पायाभूत सुविधा एका समूहाच्या ताब्यात जात आहेत. हा लोकशाहीसाठी आणि देशाच्या भविष्यासाठी गंभीर धोका आहे. पंतप्रधानांनी हे वेळीच समजून घ्यायला हवे. असं देखील राज ठाकरे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com