जगू द्याल की नाही?, चिडलेल्या राज ठाकरेंनी सुनावले

Raj Thackeray Latest News : राज ठाकरे दोन दिसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत.
Raj Thackeray
Raj Thackeraysarkarnama
Published on
Updated on

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे पुण्यामध्ये पुस्तके खरेदी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना गराडा घातला. त्यावर राज ठाकरे माध्यमांच्या प्रतिनिधींवर भडकले.

राज ठाकरे पुस्तक खरेदी करायला आले असता माध्यमांवर भडकले. जगू द्याल का नाही? म्हणत राज ठाकरे त्यांनी माध्यमांना चांगलेच सुनावले. राज ठाकरे हे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. त्यामुळे ते काही पुस्तके खरेदी करण्यासाठी आहे होते. राज हे नेहमीच नवीन पुस्तके खरेदी करतात. अक्षरधारा हा त्यांचा नेहमीचा ठिय्या आहे. सजग वाचक म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यांच्या अयोध्या दौऱ्याच्या घोषणेनंतर ते सध्या देशभर चर्चेत आहेत. त्यामुळे माध्यमांचा ससेमीरा त्यांच्या मागे आहे. राज ठाकरे घरातून निघाले, या रस्त्यावर आले, येथे पोहोचले, असे त्यांच्या दौऱ्याबाबत साद्यंत वृत्तांत दिला जातो. त्यामुळे ते पुण्यात आल्यानंतर पुण्यातील माध्यमांनी त्यांचा पाठलाग आज दिवसभर केला. त्याचा कडेलोट पुस्तके खरेदी करतानाच्या प्रसंगी झाला.

Raj Thackeray
आता हा 'गेम' राज ठाकरेंच्या हातात! भाजप खासदाराने योगींनाही पकडलं कोंडीत

दरम्यान, राज ठाकरे पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्याही भेटी घेणार आहेत. मुंबई, ठाणे आणि औरंगाबादनंतर राज ठाकरे यांनी पुण्यातही (Pune) सभा होणार आहे. अयोध्या दौऱ्यापूर्वी राज ठाकरे यांची ही सभा होणार आहे. राज यांच्या सभेसाठी मनसेकडून पुणे पोलिसांकडे परवानगीसाठी अर्ज करण्यात आला होता. येत्या २१ मे ते २८ मे रोजी पुण्यातील भिडे पुलाशेजारी नदी पात्राच्या रस्त्यालगत त्यांची सभा होण्याची शक्यता आहे. त्यासाठी मनसैनिकांनी तयारी सुरू केली असून पोलिसांनी देखली जागेची पाहणी केली आहे.

ज्या ठिकाणी मनसे पदाधिकाऱ्यांनी सभाग घेण्याची मागणी केली आहे. त्या ठिकाणाची एनओसी संबधित खात्याने दिल्यानंतरच मनसेला आम्ही सभेसाठी परवानगी देऊ, असे डेक्कन पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे पुण्यातील मनसेमध्ये असलेला अंतर्गत वाद तसेच, सभा या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे.

Raj Thackeray
राजकीय घडामोडींना वेग : संभाजीराजेंना शिवसेना प्रवेशाची अट; तरच राज्यसभेचे तिकीट!

राज ठाकरे यांच्या भाजपचे अयोध्येतील खासदार ब्रिजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांचा राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध कायम आहे. त्यांनी मंगळवारी पत्रकार परिषद माफी मागितल्याशिवाय त्यांना अयोध्येत येऊ देणार नाही, असा निर्वाणीचा इशारा दिला, त्यावरही राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यात चर्चा होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com